शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

संचारबंदीला वाशिमकरांचा प्रतिसाद, रस्त्यांवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 4:44 PM

Curfew in Washim संचारबंदीत रविवारी जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला.

वाशिम: कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवारी सायंकाळी ५ वाजतापासून लागू झालेल्या संचारबंदीत रविवारी जिल्ह्यातील बाजारपेठ कडकडीत बंद राहिल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. अत्यावश्यक सेवा आणि प्रवाशी वाहतुकीचा अपवाद वगळता घराबाहेर कुणी पडले नसल्याचे दिसून आले.जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले आहेत. त्यानुसार वाशिम जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २१ फेब्रुवारी रोजी संचारबंदीचा सुधारीत आदेश जारी केला. त्यानुसार आठवड्याअखेर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत संचारबंदी असून या दरम्यान जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. यामधून दवाखाने, मेडीकल्स, दुग्धविक्रेते/डेअरी, प्रवाशी वाहतूक व आॅटो वाहतूक आदींना वगळण्यात आले. शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजतापासून लागू झालेल्या संचारबंदीत रविवार, २८ फेब्रुवारी रोजी दिवसभर जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर व मानोरा शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत सर्व दुकाने बंद होती. दरम्यान, प्रवाशी वाहतूक सुरू असल्याने रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनांचा प्रवासही सुसाट असल्याचे पाहावयास मिळाले. प्रमुख चौकांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त असल्याने नागरिकांची वर्दळ दिसून आली नाही. प्रमुख शहरांमध्ये शुकशुकाटसंचारबंदी आदेशाचे पालन म्हणून वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर या प्रमुख शहरांसह शेलुबाजार, अनसिंग, शिरपूर, कामरगाव, धनज, शेंदुरजना अढाव, मेडशी, रिठद आदी गावांमधील बाजारपेठ कडकडीत बंद असल्याने शुकशुकाट दिसून आला.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक