वाशिम : किन्हीराजाजवळ कांदा घेवून जाणारा ट्रक उलटला; ट्रकचालक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 21:14 IST2018-01-13T21:13:33+5:302018-01-13T21:14:39+5:30
किन्हीराजा (वाशिम): कांदा घेवून भरधाव वेगात जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच.२० सी.टी. ७०९०) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटला. ही घटना येथून जवळच असलेल्या नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल किन्हीनजिक १३ जानेवारीला सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

वाशिम : किन्हीराजाजवळ कांदा घेवून जाणारा ट्रक उलटला; ट्रकचालक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
किन्हीराजा (वाशिम): कांदा घेवून भरधाव वेगात जाणारा ट्रक (क्रमांक एम.एच.२० सी.टी. ७०९०) चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उलटला. ही घटना येथून जवळच असलेल्या नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील हॉटेल किन्हीनजिक १३ जानेवारीला सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, धुळे मालेगाव येथून कांदा घेवून उडिसा येथे भरधाव वेगात जाणाºया ट्रकच्या चालकाचे हॉटेल किन्हीनजिक वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक थेट रस्त्याच्या कडेला उतरून उलटला. या अपघातात ट्रकचालक जखमी झाला असून त्यास उपचाराकरिता किन्हीराजा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती.