Washim: सोयाबीन गंजीला आग; एक लाखाचे नुकसान

By संतोष वानखडे | Updated: October 8, 2023 17:03 IST2023-10-08T17:03:33+5:302023-10-08T17:03:53+5:30

Washim: सोयाबीनच्या गंजीला आग लागून जवळपास एक लाखांचे नुकसान झाल्याची घटना मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथे ८ ऑक्टोबरच्या दुपारी एक वाजता घडली.

Washim: Soybean Bunch Fire; A loss of one lakh | Washim: सोयाबीन गंजीला आग; एक लाखाचे नुकसान

Washim: सोयाबीन गंजीला आग; एक लाखाचे नुकसान

- संतोष वानखडे
वाशिम - सोयाबीनच्या गंजीला आग लागून जवळपास एक लाखांचे नुकसान झाल्याची घटना मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथे ८ ऑक्टोबरच्या दुपारी एक वाजता घडली.

मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील मंगल धंदू राठोड यांचे सोमेश्वर नगर शेतशिवारात साडेतीन एकरात सोयाबीनची पेरणी केली होती. जिल्ह्यात सध्या सोयाबीन सोंगणीचा हंगाम सुरू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी सोयाबीन सोंगून एका ठिकाणी गंजी लावली होती. ८ ऑक्टोबरच्या दुपारच्या दरम्यान इलेक्ट्रिक शार्टसर्किट होवून गंजीला आग लागली. यामध्ये १८ ते २० क्विंटल शेतमालाचे अंदाजे एक लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज मंगल राठोड यांनी वर्तविला. महसूल व पोलीस प्रशासनास याबाबत माहिती दिली असून, रविवार असल्याने उशिरापर्यंत तलाठ्यांनी पंचनामा केला नव्हता. शेतकऱ्याला भरीव आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Washim: Soybean Bunch Fire; A loss of one lakh