वाशिम : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त १२ जानेवारीला शालेय मॅरेथॉन स्पर्धा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 19:13 IST2018-01-10T19:13:04+5:302018-01-10T19:13:28+5:30

वाशिम: राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोकलगावच्या श्री स्वामी विवेकानंद विद्यालय व महाविद्यालयाच्या वतीने १२ जानेवारीला शालेय विद्यार्थ्यांकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Washim: The school marathon event on 12th January on the occasion of National Youth Day! | वाशिम : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त १२ जानेवारीला शालेय मॅरेथॉन स्पर्धा!

वाशिम : राष्ट्रीय युवा दिनानिमित्त १२ जानेवारीला शालेय मॅरेथॉन स्पर्धा!

ठळक मुद्देसहभागी होण्याचे आवाहन: क्रीडा अधिकारी कार्यालयाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोकलगावच्या श्री स्वामी विवेकानंद विद्यालय व महाविद्यालयाच्या वतीने १२ जानेवारीला शालेय विद्यार्थ्यांकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 
क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन, पुणेअंतर्गत वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोकलगाव (ता. वाशिम) येथील श्री स्वामी विवेकानंद विद्यालय व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने युगाचार्य स्वामी विवेकानंद यांचा १२ जानेवारी हा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त यादिवशी सकाळी ९ वाजता शालेय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत शाळा, शैक्षणिक संस्था, युवक मंडळांनी सहभागी होऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
 
Web Title: Washim: The school marathon event on 12th January on the occasion of National Youth Day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.