वाशिम: प्रेमीयुगलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 13:06 IST2019-04-15T13:05:16+5:302019-04-15T13:06:53+5:30

वाशिम: येथिल महाराणा प्रताप चौकामधील एका आखाड्यामधे प्रेमीयुगलाने (दोघेही रा. वाशिम) गळफास घेऊन आत्महत्या केली.

Washim: Lover has committed suicide by hanging | वाशिम: प्रेमीयुगलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

वाशिम: प्रेमीयुगलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

वाशिम: येथिल महाराणा प्रताप चौकामधील एका आखाड्यामधे प्रेमीयुगलाने (दोघेही रा. वाशिम) गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारला सकाळी उघडकीस आली. 
येथिल महाराणा प्रताप चौकामधे वास्तव्यास असलेला युवक आशिष उमेश दिक्षीत (वय २८) व कान्होपात्रा माधव राऊत (वय २२) या दोघांचे एकमेंकावर प्रेम होते. दोघांनीही सोमवारला पहाटे एका आखाड्यामधील आडव्या लोखंडी पोलला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी युवतीने गळ्यामध्ये मंगळसुत्र,पायामधे जोडवे व  भांगेमधे कुंकू भरलेले आढळून आले. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहली. त्यामधे आम्ही एकमेंकावर प्रेम करत असून आमच्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरु नये असा उल्लेख होता. 
या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक अश्विनी धोंडगे, 
सहा. पोलीस उपनिरिक्षक भास्करराव देशमुख,  जमादार  सिध्दार्थ राऊत, पोलीस शिपाई भगवान मुकाडे करीत आहेत.

Web Title: Washim: Lover has committed suicide by hanging