वाशिम: मोटारपंप चोरीप्रकरणी चार आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 02:19 IST2018-04-09T02:19:14+5:302018-04-09T02:19:14+5:30

आसेगाव पो.स्टे.(वाशिम) : स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया भिलडोंगर येथील सहा शेतक-यांचे मोटारपंप अज्ञात चोरट्यांनी ५ एप्रिल रोजी रात्री लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे गतीने फिरवत ८ एप्रिल रोजी खांबाळा (ता.मानोरा) येथील चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पाच मोटारी जप्त केल्या. संबंधित चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

Washim: Four accused arrested for motorpump theft | वाशिम: मोटारपंप चोरीप्रकरणी चार आरोपींना अटक

वाशिम: मोटारपंप चोरीप्रकरणी चार आरोपींना अटक

ठळक मुद्देपाच मोटारी जप्त आरोपी मानोरा तालुक्यातील खांबाळा येथील

लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव पो.स्टे.(वाशिम) : स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया भिलडोंगर येथील सहा शेतक-यांचे मोटारपंप अज्ञात चोरट्यांनी ५ एप्रिल रोजी रात्री लंपास केले. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची सूत्रे गतीने फिरवत ८ एप्रिल रोजी खांबाळा (ता.मानोरा) येथील चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून पाच मोटारी जप्त केल्या. संबंधित चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिलडोंगर येथील तलावावर लावण्यात आलेले सहा शेतक-यांचे ७.५ अश्वशक्तीचे मोटारपंप चोरट्यांनी चोरून नेल्याप्रकरणी संतोष तुकाराम चव्हाण यांच्या फिर्यादीवरून ६ एप्रिलला पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी खांबाळा येथील हेमंत सुखदेव खडसे, सुधीर अशोक झळके, मुंगसीराम झळके, तुळशीराम झळके या चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ८५ हजार रुपये किमतीच्या पाच मोटारी जप्त केल्या. एक आरोपी अज्ञात फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या कारवाईत ठाणेदार विनायक जाधव यांच्यासह ज्ञानेश्वर राठोड, ज्ञानदेव उगले, चैतन्य भोयर, शेषराव डाबेराव, अशोक चव्हाण, नागेश राठोड, जावेद बेनिवाले यांनी सहभाग घेतला.
 
Web Title: Washim: Four accused arrested for motorpump theft