पोलीस स्टेशन आवारातच दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:26 AM2017-10-24T01:26:36+5:302017-10-24T01:27:19+5:30

रिसोड: पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार मागे घे, या कारणाहून  २३ ऑक्टोबर रोजी रिसोड पोलीस स्टेशन आवारात दोन गटात  हाणामारी झाली. दोन्ही गटाने परस्पराविरुद्ध दिलेल्या तक्रारीहून  रिसोड पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण १४ जणांविरुद्ध विविध  कलमान्वये गुन्हे दाखल केले. यामध्ये एका नगरसेवकाचाही  समावेश आहे.

Clash in two groups in police station premises | पोलीस स्टेशन आवारातच दोन गटात हाणामारी

पोलीस स्टेशन आवारातच दोन गटात हाणामारी

Next
ठळक मुद्देनगरसेवकाचा समावेश १४ जणांविरुद्ध गुन्हे



लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड: पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार मागे घे, या कारणाहून  २३ ऑक्टोबर रोजी रिसोड पोलीस स्टेशन आवारात दोन गटात  हाणामारी झाली. दोन्ही गटाने परस्पराविरुद्ध दिलेल्या तक्रारीहून  रिसोड पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण १४ जणांविरुद्ध विविध  कलमान्वये गुन्हे दाखल केले. यामध्ये एका नगरसेवकाचाही  समावेश आहे.
रिसोड शहरातील आसनगल्ली परिसरात वास्तव्यास असलेले  जगन्नाथ नेमाडे यांच्या घरासमोर भाउबीजेच्या दिवशी सायंकाळी  पंकज हलगे यांनी फटाके फोडल्यावरून शाब्दिक वाद निर्माण  झाला होता.
 प्रकरण पोलिसांना तक्रार देण्यापर्यंत गेले होते. त्यातून सदर  घटनेची दखल घेत पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींना पोलीस  स्टेशनला बोलविले होते. सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी दुपारी  १२ वाजता पोलीस स्टेशन आवारात दोन्ही गटातील मंडळी  जमली. 
यावेळी दोन्ही गटात सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली. याचे  रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटातील नागरिकांनी एकमेकांना  मारहाण केली. परस्परविरोधी तक्रारीहून रिसोड पोलिसांनी दोन्ही  गटातील १४ जणांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४७, १४९,  ३२३, १३५ नुसार गुन्हे दाखल केले. जगन्नाथ o्रावण नेमाडे  यांनी दिलेल्या तक्रारीवरून नगसेवक सागर डांगे, पंकज हलगे,  सोनू हांडे, प्रदीप घायाळ, शंकर पत्तरवाळे, गणेश देशपांडे, सूरज  चिपडे यांच्यावर गुन्हे दाखल केले तर मयूर अशोक हांडे यांनी  दिलेल्या तक्रारीवरून अँड. कृष्णा आसनकर, जगन्नाथ  नेमाडे,  किरण कंडाळे, बजरंग कोकाटे, चैतन्य आसनकर, अशेक  थोरात, हरिष नेमाडे यांच्या विरोधात उपरोक्त कलमान्वये गुन्हे  दाखल केले.
 घटनेतील अशोक थोरात, सोनू  हांडे, पंकज हलगे या तीन  जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित ११ आरोपी  फरार झाले आहेत. फरार आरोपींचा शोध रिसोड पोलीस घेत  आहेत. सदर घटनेचा तपास ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संजय आमटे, जनार्धन गिव्हे  करीत आहेत. 

Web Title: Clash in two groups in police station premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा