शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्याची पैसेवारी ५0 पैश्याच्या आत!

By admin | Updated: November 16, 2014 01:52 IST

खरिपाची सुधारित आणेवारी जाहीर :शेतक-यांना किंचीत दिलासा.

वाशिम : यंदाच्या खरीप हंमागात सोयाबीनच्या पिकाने दगा दिल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना जिल्हा प्रशासनाने काहीअंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. खरीप हंगामाकरिता प्रशासनाने जाहीर केलेली सुधारित पैसेवारी ५0 पैश्यापेक्षा कमी आल्यामुळे जिल्हा टंचाईग्रस्त म्हणून जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यंदा सोयाबीनच्या पिकांवर मोठय़ा प्रमाणात रोगराईचा प्रकोप झाला होता. परिणामी, उत्पादनात कमालीची घट झाली. उत्पादन खर्च व प्रत्यक्ष उत्पादन यामधील तफावत वाढल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या शेतकर्‍यांना शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. शासकीय मदत जाहीर करण्यासाठी अथवा जिल्हा टंचाईग्रस्त जाहीर करण्यासाठी जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५0 पैश्यांपेक्षा कमी असणे आवश्यक असते. प्रशासनाने जाहीर केलेली पैसेवारी ५0 पैश्यापेक्षा कमी आल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील १३१ गावांची पैसेवारी ४४ पैसे इतकी आहे, तर मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे. रिसोड तालुक्यातील १00 गावांची पैसेवारी ४६ पैसे असून, मंगरूळपीर तालुक्यातील १३७ गावांची पैसेवारी ४६ पैसे इतकी आहे. कारंजा तालुक्यातील १६७ गावांची आकडेवारी ३७ पैसे तर मानोरा तालुक्यातील १३६ गावांची पैसेवारी ४७ पैसे इतकी निश्‍चित करण्यात आली आहे.