वाशिम जिल्हा प्रशासनाला खादी वस्त्रांचा पडला विसर; प्रचार-प्रसार नावापुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 04:01 PM2018-01-15T16:01:30+5:302018-01-15T16:04:18+5:30

वाशिम: खादीच्या कपड्यांचा प्रचार-प्रसार नावापुरताच उरला असून आठवड्यातील एक दिवस प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयाने खादीचे वस्त्र परिधान करूनच कार्यालयात यावे, असे ठरवूनही वाशिम जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाºयांनी खादीच्या वापराकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसनू येत आहे. 

Washim district administration forgets Khadi clothes | वाशिम जिल्हा प्रशासनाला खादी वस्त्रांचा पडला विसर; प्रचार-प्रसार नावापुरताच

वाशिम जिल्हा प्रशासनाला खादी वस्त्रांचा पडला विसर; प्रचार-प्रसार नावापुरताच

googlenewsNext
ठळक मुद्देप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे. प्रधानमंत्र्यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये ‘मन की बात’ या कार्यक्रमातून खादीचा वापर वाढल्याचे सांगितले होते. वाशिम जिल्ह्यात तर प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांकडून शासनाच्या निर्देशाचे पालन करण्यापुरतेच वर्षातून काहीवेळ खादीचा प्रचार-प्रसार केला जातो. वाशिममधील एका कॉम्प्लेक्समध्ये तीन दिवस खादी व ग्रामोद्योगी वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते; मात्र त्यानंतर विशेष प्रचार-प्रसार झाला नाही.

वाशिम: खादीच्या कपड्यांचा प्रचार-प्रसार नावापुरताच उरला असून आठवड्यातील एक दिवस प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयाने खादीचे वस्त्र परिधान करूनच कार्यालयात यावे, असे ठरवूनही वाशिम जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी खादीच्या वापराकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसनू येत आहे. 
‘एक काळ असा होता की खादी फॉर नेशन असे मानले जायचे, पण आपल्याला असे वाटत नाही का की आता ‘खादी फॉर फॅशन’, ही काळाची गरज आहे ? आणि मी लोकांना खादीचे कपडे खरेदी करण्यासाठी आग्रह केला, विनंती केली. थोडीतरी खादीच्या कपड्यांची खरेदी करा, आज मी अत्यंत आनंदाने, समाधानाने सांगू शकतो की मागच्या एका वर्षात खादीची विक्री दुप्पट झाली. आता हे काही सरकारी जाहिरातीमुळे नाही झाले. लाखो रुपये खर्च करुन नाही झाले, केवळ जनशक्तीच्या अनुभूतिमुळे, निश्चयामुळे आणि निधार्रातून, अनुभवातून झाले’, हे बोल आहेत दस्तुरखुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे. प्रधानमंत्र्यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये ‘मन की बात’ या कार्यक्रमातून खादीचा वापर वाढल्याचे सांगितले होते. परिस्थिती मात्र वेगळीच असून वाशिम जिल्ह्यात तर प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांकडून शासनाच्या निर्देशाचे पालन करण्यापुरतेच वर्षातून काहीवेळ खादीचा प्रचार-प्रसार केला जातो. त्यानंतर मात्र खादीकडे कुणी ढुंकूनही पाहत नसल्याची स्थिती आहे. 
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राज्यात महाखादी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा ३० नोव्हेंबर २०१७ रोजी वाशिम शहरात दाखल झाली. याअंतर्गत वाशिममधील एका कॉम्प्लेक्समध्ये तीन दिवस खादी व ग्रामोद्योगी वस्तूंचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. मात्र त्यानंतर विशेष प्रचार-प्रसार झाला नाही.

Web Title: Washim district administration forgets Khadi clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.