लोकमत न्यूज नेटवर्कजऊळका रेल्वे: काळामाथा येथील अवलिया महाराजांच्या यात्रेतून घराकडे परतणार्या इसमांची मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेल्या कोंडू डाखोरे (वय ३८ वर्षे) या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी ४ फेब्रुवारीला गुन्हय़ाची नोंद केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बबन ठाकरे (रा. दुर्गाबोरी, ता. मेहकर, जि. बुलडाणा) हे आणि त्यांचा मित्र कोंडू डाखोरे (वय ३८ वर्षे) हे दोघे काळामाथा यात्रेत दर्शनासाठी आले होते. दरम्यान, यात्रा आटोपून घरी परत जात असताना त्यांची मोटारसायकल (क्रमांक एम.एच.२८ एडब्ल्यू ८४५७) काळामाथा ते जऊळका रेल्वे दरम्यानच्या रस्त्यावरील चढावर घसरली. यात दोघेही जखमी झाले. मात्र, कोंडू डाखोरे यास जबर दुखापत होती. त्यामुळे त्यास अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी कलम २७९, ३५७, ३0४ ‘अ’ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
वाशिम : काळामाथा ते जऊळका रेल्वे दरम्यानच्या अपघातातील जखमी इसमाचा मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 01:19 IST
जऊळका रेल्वे: काळामाथा येथील अवलिया महाराजांच्या यात्रेतून घराकडे परतणार्या इसमांची मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी असलेल्या कोंडू डाखोरे (वय ३८ वर्षे) या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी ४ फेब्रुवारीला गुन्हय़ाची नोंद केली आहे.
वाशिम : काळामाथा ते जऊळका रेल्वे दरम्यानच्या अपघातातील जखमी इसमाचा मृत्यू!
ठळक मुद्देकोंडू डाखोरे (वय ३८ वर्षे) असे मृतकाचे नावकाळामाथा येथून मेहकरकडे परतत असताना घडला अपघात