वाशिम: मारहाणप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:47 IST2018-03-05T01:47:01+5:302018-03-05T01:47:01+5:30

वाशिम : जिल्ह्यातील कारखेडा (ता.मानोरा) येथे झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध ४ मार्चला विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. 

Washim: Crime against the trio | वाशिम: मारहाणप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे

वाशिम: मारहाणप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हे

ठळक मुद्देविविध कलमान्वये गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील कारखेडा (ता.मानोरा) येथे झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध ४ मार्चला विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. 
याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, कारखेडा येथील नंदा तुळशिराम मात्रे व तिचा पती तुळशिदास बाबुसा मात्रे यांना भिंतीचे बांधकाम करताना घराशेजारी राहणारे शेखर भीमराव मात्रे, रेखा शेखर मात्रे, विमल भीमराव मात्रे यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेत तुळशिदास मात्रे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. नंदा मात्रे यांच्या अशा आशयाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नमूद तीनही आरोपींविरुद्ध कलम ३२५, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास बीट जमादार विजय जाधव, डिगांबर राठोड करीत आहेत.

Web Title: Washim: Crime against the trio