वाशिम : मिरणुकीत शस्त्रे  बाळगल्याप्रकरणी गुन्हा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:42 PM2017-12-05T13:42:10+5:302017-12-05T13:44:28+5:30

वाशिम : ईद ए मिलाद निमित्त वाशिम शहरामधून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये सहा सात इसमांनी तलवारी बाळगल्याप्रकरणी त्यांचेवर शहर पोलीसांनी आर्म अ‍ॅक््ट अंर्तगत कलम ४/२५ सहकलम १३४, १४० मुंबई कायद्यान्वये सोमवारला गुन्हा दाखल करण्यात आला. 

Washim: Crime against the person demonstrating arms | वाशिम : मिरणुकीत शस्त्रे  बाळगल्याप्रकरणी गुन्हा 

वाशिम : मिरणुकीत शस्त्रे  बाळगल्याप्रकरणी गुन्हा 

Next
ठळक मुद्देसात जणांचा समावेश अटक केल्यानंतर त्यांची नावे जाहिर करण्यात येतील

वाशिम : ईद ए मिलाद निमित्त वाशिम शहरामधून काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये सहा सात इसमांनी तलवारी बाळगल्याप्रकरणी त्यांचेवर शहर पोलीसांनी आर्म अ‍ॅक््ट अंर्तगत कलम ४/२५ सहकलम १३४, १४० मुंबई कायद्यान्वये सोमवारला गुन्हा दाखल करण्यात आला. 

ईद ए मिलाद निमित्त वाशिम शहरामधुन शुक्रवारला मुस्लीम बांधवांच्या वतीने मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये पाच ते सात इसम तलवारी घेऊन घोड्यावर नाचताना आढळुन आले. या इसमांनी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे नायक पोलीस शिपाई प्रशांत अंभोरे यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशन मध्ये सोमवारला फिर्याद दाखल केली. या फिर्यादीहून पोलीसांनी पाच ते सात इसमांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. सदर इसम सध्या पसार झाले असुन त्यांना अटक केल्यानंतर त्यांची नावे जाहिर करण्यात येतील असे पालीस दलाच्या वतीने सांगण्यात आले 

Web Title: Washim: Crime against the person demonstrating arms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.