वाशिम : बसची दुचाकीला धडक; दोन भाऊ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 01:53 IST2018-01-10T01:53:01+5:302018-01-10T01:53:11+5:30

मानोरा (वाशिम) : एस.टी.बसने दुचाकीला धडक दिल्याने दोघे भाऊ घटनास्थळावरच ठार झाल्याची घटना मंगरुळपीर - मानोरा रस्त्यावरील रोहणा फाट्याजवळ ९ जानेवारी रोजी घडली. 

Washim: Bus bikes hit; Two brothers killed | वाशिम : बसची दुचाकीला धडक; दोन भाऊ ठार

वाशिम : बसची दुचाकीला धडक; दोन भाऊ ठार

ठळक मुद्देमंगरुळपीर-मानोरा रस्त्यावरील रोहणा फाट्याजवळील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा (वाशिम) : एस.टी.बसने दुचाकीला धडक दिल्याने दोघे भाऊ घटनास्थळावरच ठार झाल्याची घटना मंगरुळपीर - मानोरा रस्त्यावरील रोहणा फाट्याजवळ ९ जानेवारी रोजी घडली. 
मंगरुळपीरवरून मोतसावंगा येथील विजय बालाजी बोंडे (वय २२) व विष्णू बालाजी बोंडे (वय १९) हे दोघे भाऊ नुकतीच खरेदी केलेल्या दुचाकीने मानोराकडे येत होते. दरम्यान, रोहणा फाट्याजवळ वळण रस्त्यावर भरधाव जाणार्‍या एस.टी.बस क्रमांक एम.एच.४0 एन.८४५३ या बसने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघे भाऊ जागीच ठार झाले. सदर घटना घडल्याची वार्ता परिसरात पसरताच बघ्यांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. अपघात घडल्यानंतर एस.टी.बसचालकाने मानोरा पोलीस स्टेशनला माहिती दिली.

Web Title: Washim: Bus bikes hit; Two brothers killed