Washim: जागेच्या कारणावरून दोन सख्ख्या भावांत हाणामारी

By संतोष वानखडे | Updated: June 21, 2023 16:14 IST2023-06-21T16:14:04+5:302023-06-21T16:14:21+5:30

Washim: मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ऊमरी खुर्द येथे जागेच्या कारणावरून दोन सख्ख्य भावांत २० जून रोजी हाणामारी झाली. याप्रकरणी २१ जूनला पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला.

Washim: A fight between two brothers over space | Washim: जागेच्या कारणावरून दोन सख्ख्या भावांत हाणामारी

Washim: जागेच्या कारणावरून दोन सख्ख्या भावांत हाणामारी

- संतोष वानखडे

वाशिम - मानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ऊमरी खुर्द येथे जागेच्या कारणावरून दोन सख्ख्य भावांत २० जून रोजी हाणामारी झाली. याप्रकरणी २१ जूनला पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला.

फिर्यादी संतोष बाबुसिंग आडे रा. ऊमरी खुर्द यांनी तक्रार दिली की, ते सहा भाऊ एकत्र एका वाड्यात जवळ-जवळ राहतात. ती सर्व जागा फिर्यादीचे नावे आहे. सर्व भाऊ मिळून ४० गायी आहेत. त्या सर्व गायी मोठा भाऊ राजेश बबुसिंग आडे यांना देखभाल करण्यासाठी दिल्या असून, त्या सर्व गायीचे शेणखत अंगणात टाकण्यात येते. मुले लहान असल्याने शेण अंगणात न टाकता घराचे मागे टाकत जा, असे राजेश याला फिर्यादीने वारंवार सांगितले. २० जून रोजी सकाळी १०:३० वाजतादरम्यान अंगणात खड्डा पडल्याने येथे मुरूम टाकण्यासाठी फिर्यादीने ट्रॅक्टर ट्रॉली आणली असता, राजेश आडे यांनी मुरूम टाकण्यास मज्जाव केला व शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता हाती असलेला विळा फिर्यादीच्या डोक्यावर मारला.

राजेश यांचा मुलगा सिद्धांत राजेश आडे, त्याची पत्नी सुशिला राजेश आडे,त्याचा जावई सुनील दुर्गादास राठोड यांनीदेखील फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादीचे इतर भाऊ व पुतण्या आकाश यांनी भांडण सोडविले. याप्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी वरील नमूद चार आरोपींवर भादंवी कलम ३२४, ५०४, ५९६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. अधिक तपास मानोरा पोलीस करीत आहेत.

Web Title: Washim: A fight between two brothers over space