Washim: व्यापारी संकुलातील ७ गाळयांना ठाेकले सील, नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची धडक कारवाई

By नंदकिशोर नारे | Published: October 12, 2023 05:13 PM2023-10-12T17:13:22+5:302023-10-12T17:13:44+5:30

Washim: वाशिम येथील नगरपरिषदेच्या अकाेला नाका येथील व्यापारी संकुलामध्ये अनेक व्यापाऱ्यांनी केवळ अनामत रक्कम भरुन गाळयांवर जप्ती केली हाेती. यापूर्वी अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्याकडून अधिमुल्य रक्कम घेतल्यानंतरही माेठया प्रमाणात रक्कम थकीत हाेती.

Washim: 7 channels in the commercial complex were sealed, municipal council chief officers took action | Washim: व्यापारी संकुलातील ७ गाळयांना ठाेकले सील, नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची धडक कारवाई

Washim: व्यापारी संकुलातील ७ गाळयांना ठाेकले सील, नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची धडक कारवाई

- नंदकिशोर नारे
वाशिम - येथील नगरपरिषदेच्या अकाेला नाका येथील व्यापारी संकुलामध्ये अनेक व्यापाऱ्यांनी केवळ अनामत रक्कम भरुन गाळयांवर जप्ती केली हाेती. यापूर्वी अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांच्याकडून अधिमुल्य रक्कम घेतल्यानंतरही माेठया प्रमाणात रक्कम थकीत हाेती. याबाबत वारंवार सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने अखेर १२ ऑक्टाेबर राेजी सकाळी ११ वाजता नगरपरिषद मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांनी धडक कारवाई करीत ७ गाळयांना (दुकाने) सील ठाेकले. या कारवाईने येथील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

वाशिम नगरपरिषदेकडून या कारवाईच्या माेहीमेस १२ ऑक्टाेबरपासून सुरुवात करण्यात आली असून सदरची कारवाई मुख्याधिकारी गायकवाड यांच्या नेतृत्वात मिळकत व्यवस्थापक जगदीश नागलाेत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. व्यापारी संकुलातील ए विंगमध्ये एकूण १४ गाळे जप्तीस पात्र हाेते. त्यापैकी ७ गाळयांना आज सिल करण्यात आले. त्यामध्ये काही व्यापाऱ्यांनी नगदी स्वरुपात ३० लाख थकीत अधिमुल्य रकमेचा भरणा केलेला आहे. ही रक्कम फक्त मुळ अधिमुल्य रक्कमेतील आहे. ज्यामध्ये दुकान भाडे, शास्ती कर ई. घेणे बाकी आहे. यावेळी कारवाई सुरु असताना मुख्याधिकारी यांचेकडे गाळेधारकांनी मुदत मागितली असता २० ऑक्टाेबरपर्यंत थकीत अधिमुल्य रक्कम भरण्याचे सांगितले. त्यानंतर हाेणारी कारवाई तीव्र असेल व यासाठी लागणारा खर्च गाळेधारकांकडून वसूल केल्या जाणार असल्याचे सांगितले.  यावेळी नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता अशाेक अग्रवाल, राहुल मारकड, उज्वल देशमुख, वसंत पाटील, अमाेल कुमावत, गजानन हिरेमठ, प्रकाश गणेशपुरे, राम वानखेडे, संताेष किरळकर, नरेंद्र साकरकर, अक्षय तिरपुडे,  शिवाजी इंगळे यासह नगरपरिषदेमधील कर्मचारी माेठया प्रमाणात उपस्थित हाेते.

प्रभारी मुख्याधिकारी मिन्नु पिएम यांनी उचलला हाेता प्रथम प्रश्न
परिविक्षाधिन अधिकारी तसेच वाशिमच्या प्रभारी मुख्याधिकारी मिन्नु पिएम यांनी सर्वात प्रथम हा प्रश्न उचलला हाेता. तेव्हा व्यापाऱ्यांनी त्यांना मुदत मागितली हाेती. त्यांच्या कारवाईमुळे लाखाे रुपये नगरपरिषदेचे वसूल झाले हाेते. आता मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांना मिळकत विभागामार्फत वेळाेवेळी थकीत अधिमुल्य रक्कत भरण्याबाबत सूचना केल्या आहेत. २० ऑक्टाेबर पर्यंत आता मुदत देण्यात आली असून ताेपर्यंत पैसे न भरल्यास कारवाई तीव्र करणार आहाेत.
निलेश गायकवाड, मुख्याधिकारी नगरपरिषद वाशिम

Web Title: Washim: 7 channels in the commercial complex were sealed, municipal council chief officers took action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम