वाशिम : अतिजोखीम गटात आढळले ४३ हजार नागरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 13:05 IST2020-10-27T13:03:14+5:302020-10-27T13:05:23+5:30
जिल्ह्यातील तीन लाख १२ हजार १६६ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले.

वाशिम : अतिजोखीम गटात आढळले ४३ हजार नागरिक
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील तीन लाखावर नागरिकांचे सर्वेक्षण केले असून, यापैकी ४३ हजारावर नागरिक हे मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, हृदयरोग, किडनी आदी अतिजोखीम गटातील असल्याचे स्पष्ट झाले तसेच ३५४ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे दिसून आले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम हाती घेतली. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील तीन लाख १२ हजार १६६ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी ३०८१ जण संदिग्ध आढळले होते. यापैकी ९८८ जणांची कोरोना टेस्ट केली होती.
जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत सर्वेक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यादरम्यान ४३२१० नागरिक हे जोखीम गटात असल्याचे आढळून आले. - डाॅ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी