शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविका-मदतनीसांना अनुदानाची प्रतीक्षाच

By admin | Updated: November 30, 2014 23:59 IST

वाशिम जिल्ह्यातील प्रकार; १0७६ अंगणवाडीवर कार्यरत कर्मचारी अनुदानापासून वंचित.

वाशिम : अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात शासनाने भरघोस वाढ केली. मात्र, या वाढीपासून वाशिम जिल्ह्यातील १0७६ अंगणवाडीवर कार्यरत कर्मचारी वंचितच असल्याचे वास्तव समोर येत आहे. जिल्ह्यात १0७६ अंगणवाडी केंद्रांमधून चिमुकल्या विद्यार्थ्यांची प्राथमिक शिक्षणाची पूर्वतयारी करून घेतली जाते. १0७६ अंगणवाडी केंद्रावर तेवढय़ाच संख्येने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. अनेक अंगणवाडी केंद्रांना सुसज्ज इमारती नाहीत. भौतिक असुविधांच्या गर्तेत अडकलेल्या अंगणवाडी केंद्राप्रमाणेच आता कर्मचार्‍यांनाही मानधनापासून वंचित राहावे लागत आहे. वाढीव मानधन मिळाले नाही तसेच नियमित मानधनही दरमहा मिळत नाही, अशा व्यथा अंगणवाडी कर्मचारी व्यक्त करीत आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनामध्ये १ एप्रिल २0१४ पासून वाढ केली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत वाशिम जिल्हय़ात अंणगवाडी सेविका व मदतनीस यांचे दरमहा मानधन, इंधन, प्रवास भत्ता देयके व महिला बचत गटाचे आहार पुरवठा देयकेही वेळेवर मिळत नाहीत. याबाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, तरीही काहीच परिणाम झाला नाही, असा आरोप संघटनेचे कार्याध्यक्ष डिगांबर अंभोरे यांनी केला. अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. या पदांची पदभरती काही वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. आता पुन्हा पदभरती सुरू होणार आहे. सदर भरतीबाबतची माहिती गावोगावे देण्यासाठी कर्मचार्‍यांना दवंडी देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई गणेशपुरे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना विविध बैठका व इतर शासकीय कामानिमित्त तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी उपस्थित राहावे लागते. यासाठी इंधन, प्रवास भत्ता दिला जातो. गत तीन ते चार महिन्यांपासून जवळपास ६0 टक्के कर्मचार्‍यांना प्रवास भत्ता व इंधन खर्चही देण्यात आला नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांवर आर्थिक संकटाची तलवार आहे.