वाशिम जिल्ह्यातील पडक्या शासकीय इमारतींना दुरुस्तीची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 16:01 IST2018-07-17T15:59:08+5:302018-07-17T16:01:19+5:30
वाशिम: जिल्ह्यातील पडक्या शासकीय इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव वरिष्ठस्तरावर वर्षभरापूर्वी पाठविण्यात आले आहेत. त्यातील केवळ चार कामांना मंजुरी मिळाली, तर प्रत्यक्ष एकाच इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होऊ शकला आहे.

वाशिम जिल्ह्यातील पडक्या शासकीय इमारतींना दुरुस्तीची प्रतिक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील पडक्या शासकीय इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव वरिष्ठस्तरावर वर्षभरापूर्वी पाठविण्यात आले आहेत. त्यातील केवळ चार कामांना मंजुरी मिळाली, तर प्रत्यक्ष एकाच इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होऊ शकला आहे.
वाशिम जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या शेकडो इमारती जीर्ण होत असून, यातील बहुतांश इमारती दुरुस्त करण्याची गरज असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भातील प्रस्ताव वर्षभरापूर्वी वरिष्ठस्तरावर पाठविले आहेत. जिल्ह्यातील जवळपास १८ इमारतींच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. या प्रस्तावांना मंजुरी मिळून अनुषंगाने निधीही उपलब्ध होणे अपेक्षीत होते; परंतु वर्षभरात केवळ ४ प्रस्तावांना मान्यता मिळाली, तर एका कामासाठी निधी उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यात शासकीय वापरात असलेल्या इमारती जीर्ण अवस्थेमुळे धोकादायक ठरत असल्याने त्यांची दुरुस्ती आवश्यक असतानाही मागणीनुसार अपेक्षीत निधी उपलब्ध होत नसल्याने इमारतींची अवस्था अधिकच गंभीर होत आहे. दरम्यान, गृहविभागांतर्गत येणाºया पोलीस निवासस्थानांची अवस्था, तर अत्यंत दयनीय असून, पडक्या निवासस्थानांतच अनेक पोलीस कर्मचाºयांचे कुटंूब वास्तव्य करून आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत पडक्या इमारतींना असलेला धोका लक्षात घेऊन या इमारतींची दुरुस्ती होण्याची प्रतिक्षा आहे.