शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मतदान ओळखपत्र नसेल तरीही आता करता येईल मतदान

By admin | Updated: October 12, 2014 02:05 IST

निवडणूक आयोगाकडून ११ पर्याय जाहीर; मतदार यादीत नाव आवश्यक.

वाशिम : ज्या मतदारांकडे मतदान ओळखपत्र नाही त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने ओळखीचा पुरावा म्हणून ११ कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा असेल तर त्या मतदाराला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी दिली.निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पर्यायी ओळखीच्या पुराव्यांमध्ये मतदार चिठ्ठीचा (वोटर स्लीप) चा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांना ही चिठ्ठी घरपोच देण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने राबवली आहे. जिल्ह्यातील ९५ टक्के मतदारांच्या मतदार चिठ्ठीवर त्यांचे छायाचित्र देण्यात आले आहे. त्यामुळे ती मतदार चिठ्ठीचिठ्ठी असताना इतर कोणतेही ओळखपत्र सोबत नसले तरी मतदाराला मतदान करता येईल असे जिल्हाधिकारी म्हणाले. मतदान ओळखपत्राला पर्यायी कागदपत्रांमध्ये पासपोर्ट,ड्रायव्हिंग लायसन्स,राज्य व केंद्र शासन, सार्वजनिक क्षेत्र उपक्रमातील, पब्लिक लिमिटेड कंपनीतील कर्मचार्‍यांचे फोटो असलेले ओळखपत्र, बँक, पोस्टाचे फोटो असलेले पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, राष्ट्रीय जनसंख्या रजिस्टरने दिलेले स्मार्ट कार्ड, श्रम मंत्रालयाचे विमा स्मार्ट कार्ड, फोटो असलेले पेन्शन ओळखपत्र,जिल्हा निवडणूक विभागाकडून वाटप करण्यात आलेली फोटो असलेली मतदार चिठ्ठी(वोटर स्लिप) आदींचा समावेश आहे.