शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

१२ ऑक्टोंबर मतदार दिवस म्हणून पाळला जावा

By admin | Updated: October 10, 2014 00:44 IST

निवडणूक निरीक्षक सेंथींल राजन यांची सूचना; मतदान केंद्रावर मिळणार सर्व माहिती.

वाशिम : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर १२ ऑक्टोंबर हा दिवस मतदार दिवस म्हणून पाळला जावा. यादिवशी सर्व मतदान केंद्रांवर मतदारांना मतदार चिठ्ठीचे वाटप केले जावे तसेच मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राविषयी सविस्तर माहिती देण्यात यावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षक सेंथींल राजन यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वीप समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी. के. इंगळे, रिसोडचे निवडणूक निर्णय अधिकारी अशोक अमानकर, कारंजाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिनकर काळे, वाशिमचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेश पारनाईक यांच्यासह स्वीप समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. निवडणूक निरीक्षक सेंथींल राजन म्हणाले की, १२ ऑक्टोंबर रोजी मतदार जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाने आतापयर्ंत खूप चांगले काम केले आहे. मात्र येथून पुढेही या कामात सातत्य राहणे आवश्यक आहे. निवडणुकीत जास्तीतजास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी स्वीप समितीने आता अधिक प्रभावी व सक्रियपणे मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे. त्यासाठी विविध माध्यमातून त्यांना मतदानाचे महत्व व मतदानाचा दिवस याविषयी आठवण करून द्यावी असे त्यांनी सांगितले. सदर बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी स्वीप कार्यक्रमाचा आढावा घेताना सर्व निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी मतदार चिठ्ठीचे वाटप लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर द्यावा. तसेच त्यावेळी संबंधित मतदाराला मतदान करण्याचे आवाहनही करण्याची सूचना त्यांनी कर्मचार्‍यांना केली.