शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादी पुनरीक्षण : १५ डिसेंबरपर्यंत नावात दुरूस्ती करावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 17:22 IST

Washim News जिल्ह्यात १७ नोव्हेंबर २०२० रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे.

वाशिम : मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीमधील नावात दुरूस्ती किंवा आक्षेप असेल तर १५ डिसेंबरपर्यंत दावे व हरकती जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांच्या कार्यालयात दाखल कराव्या असे आवाहन जिल्हा प्रशासन व निवडणूक विभागाने केले.भारत निवडणूक आयोगाने सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचा १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहिर केलेला आहे. जिल्ह्यात १७ नोव्हेंबर २०२० रोजी एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. या प्रारुप मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ठ नसतील तसेच १ जानेवारी २०२१ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण करणाºया युवक, युवतींना मतदार म्हणून नाव नोंदणीसाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. नावात दुरूस्ती असल्यास किंवा आक्षेप असल्यास १५ डिसेंबरपर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघांच्या मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ) व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयात दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. ५ जानेवारीपर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार आहेत. दुसरीकडे प्रारूप  मतदार यादीतील मयत झालेल्या, इतरत्र कायमस्वरूपी  स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी झालेल्या मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. कायमस्वरुपी स्थलांतरीत झालेल्या किंवा दुबार नोंदणी असलेल्या मतदारांनी नाव कमी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.

टॅग्स :washimवाशिमElectionनिवडणूक