शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी गृहभेटी व जनजागृती

By admin | Updated: October 27, 2016 03:18 IST

‘स्वच्छ निर्मल दिवाळी उत्सव’ उपक्रमासाठी कलावंतांची निवड.

वाशिम, दि. २६- गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी दिवाळीदरम्यान स्वच्छ निर्मल दिवाळी उत्सव हा उपक्रम कलावंतांच्या माध्यमातून २६ ऑक्टोबरपासून राबविण्याला सुरुवात झाली.सदर उपक्रम २९ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, गृहभेटीद्वारे जनजागृती केली जाणार आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांना भेटी देऊन जनजागृती करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केल्या. गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, स्वच्छागृही, आशा, अंगणवाडी कार्यकर्ते व स्वयंसेवी संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांना सोबत घेऊन हा उपक्रम राबविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी केल्या आहेत. तालुका व जिल्हा कक्षातील समन्वयक, सल्लागार यांच्यावर या कार्यक्रमांचे नियोजन करण्याची जबाबदारी सोपविली आहे.२६ ऑक्टोबर रोजी पार्डी टकमोर, गणेशपूर येथे प्रज्ञानंद भगत, सुशिलाबाई घुगे या कलावंतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तोंडगाव, तांदळी शेवई येथे वामन वाणी व पी.एस. खंदारे, एकांबा व वाघळूद येथे विलास भालेराव व विद्या भगत तर जामखेड व बोर्डी येथे उत्तम इंगोले व केशव डाखोरे या कलावंतांच्या माध्यमातून गृहभेटीद्वारे जनजागृती करण्यात आली.२७ ऑक्टोबर रोजी मांगूळझनक व पिंप्री सरहद्द येथे उत्तम इंगोले, केशव डाखोरे, लोणी बु., वाडी रायताळ येथे वामन वाणी, पी.एस. खंदारे, लावणा व कोठारी येथे प्रज्ञानंद भगत व सुशिलाबाई घुगे तर गोगरी व दाभडी येथे विलास भालेराव व विद्या भगत या कलावंतांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. २८ ऑक्टोबर रोजी फुलउंबरी व वाईगौळ येथे वामन वाणी व पी.ए. खंदारे, इंझोरी व दापुरा येथे विलास भालेराव व विद्या भगत, कामरगाव व पोहा येथे प्रज्ञानंद भगत व सुशिलाबाई भगत या कलावंतांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. २९ ऑक्टोबर रोजी धामणी खडी, धनज बु. आगरवाडी व बाळखेड येथे कलावंतांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.