Video - तलावाच्या जाळीत अडकलेल्या कासवाला असे मिळाले जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 15:57 IST2018-07-14T15:55:41+5:302018-07-14T15:57:45+5:30

देवतलावाच्या जाळीत अडकलेल्या कासवाला बाहेर काढून जीवनदान देण्यात आले आहे.

Video - Tissue caught in a pond nets got life | Video - तलावाच्या जाळीत अडकलेल्या कासवाला असे मिळाले जीवनदान

Video - तलावाच्या जाळीत अडकलेल्या कासवाला असे मिळाले जीवनदान

वाशिम : येथील स्थानिक वाशिम ग्रुपच्यावतीने देव तलावाच्या लोकसहभागातून करण्यात आलेल्या खोलीकरणानंतर तेथे येणारा कचरा काढण्यासाठी जाळी लावण्यात आली. या जाळीत अडकलेल्या कासवाला बाहेर काढून जीवनदान देण्यात आले आहे. 

वाशिम शहरातील बालाजी मंदिराजवळ देव तलावाचे खोलीकरण करण्यात आले आहे. तर पावसाळा असल्याने सद्यस्थितीत देव तलाव तुडूंब भरला आहे. या तलावाचे खोलीकरण करताना त्याची स्वच्छता करण्यात आली होती. तसेच पाण्यासोबत तलावात कचरा येत असल्याने तेथे जाळीही लावली होती. या जाळीत अडकणारा कचरा दररोज काढण्यात येत आहे. दरम्यान, आज नेहमीप्रमाणे कचरा बाहेर काढताना या जाळीत कासव अडकलेला आढळून आला. त्यानंतर तेथील भाविकांनी या कासवाला बाहेर काढून जीवनदान दिले. 

पाहा व्हिडिओ - 

Web Title: Video - Tissue caught in a pond nets got life