शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याक शाळांमधील प्रवेश प्रक्रियेची पडताळणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 10:49 IST

अल्पसंख्याक शाळेसह अन्य शाळेतील प्रवेश प्रक्रिया व त्याअनुषंगाने अन्य बाबींची पडताळणी शिक्षण विभागाने सुरू केली.

- संतोष वानखडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अल्पसंख्याक शाळेसह अन्य शाळेतील प्रवेश प्रक्रिया व त्याअनुषंगाने अन्य बाबींची पडताळणी शिक्षण विभागाने सुरू केली असून, कारंजा येथील एका अल्पसंख्याक शाळेत त्रूटी आढळून आल्या आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते.अल्पसंख्याक शाळेत नियम डावलून प्रवेश प्रक्रिया, पालक सभा डावलून जादा शुल्क आकारणी, शैक्षणिक साहित्य शाळेने सुचविलेल्या दुकानातूनच घेण्याची सक्ती, क्षमतेपेक्षा जादा प्रवेश आदीसंदर्भात ‘लोकमत’ने जून महिन्यात विविधांगी वृत्त प्रकाशित करून जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधले होते. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही जिल्हा परिषद सदस्यांनी याप्रकरणी चौकशीची मागणी रेटून धरली होती. तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी याप्रकरणी लवकरच चौकशी समिती गठीत करण्याचे तसेच या विषयाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलाविण्याचे निर्देशही दिले होते. परंतू, त्यानंतर जुलै महिन्यात जिल्हा परिषद पदाधिकारी मंडळ बरखास्त झाल्याने जिल्हा परिषदेची विशेष सभा होऊ शकली नाही.दरम्यान, शिक्षण विभागाने अल्पसंख्याक शाळेत नियमानुसार प्रवेश दिले जातात का, अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवल्या जातात का या अनुषंगाने पडताळणी सुरू केली. कारंजा येथील एका अल्पसंख्याक शाळेत नियमानुसार अल्पसंख्याक प्रवर्गातील ५० टक्के विद्यार्थी आढळून आले नसल्याची माहिती आहे. नियमानुसार कारवाईचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. वाशिम शहरातील जिल्ह्यातील अल्पसंख्याक शाळेतील प्रवेश प्रक्रियेची पडताळणी सुरू झाल्याने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

अल्पसंख्याक शाळेत नियमानुसार अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. प्रवेश प्रक्रियेची पडताळणी सुरू केली आहे. कारंजा येथील एका शाळेत नियमानुसार ५० टक्के विद्यार्थी हे अल्पसंख्याक प्रवर्गातील आढळून आले नाहीत. यासंदर्भात वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला जाईल.- अंबादास मानकरप्राथमिक शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद वाशिम.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा