राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मुरुमाऐवजी मातीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 15:37 IST2018-12-09T15:36:16+5:302018-12-09T15:37:00+5:30
वाशिम: जिल्ह्यात मानोरा-मंगरुळपीर आणि मंगरुळपीर-वाशिमदरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात समतलीकरण करताना मुरूमाऐवजी थेट काळ्यामातीचा वापर होत आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामात मुरुमाऐवजी मातीचा वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात मानोरा-मंगरुळपीर आणि मंगरुळपीर-वाशिमदरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या कामात समतलीकरण करताना मुरूमाऐवजी थेट काळ्यामातीचा वापर होत आहे. यामुळे कामाचा दर्जा खालावणार असून, कंत्राटदार नियमांचे उल्लंघन करीत असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अधिकाºयांचे मात्र त्याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.
वाशिम जिल्ह्यात कारंजा-मेहकर, वाशिम-हिंगोली, कारंजा-वाशिम आणि मानोरा-महान, यादरम्यान चार राष्ट्रीय महामार्गांची कामे करण्यात येत आहेत. या कामाचा प्राथमिक टप्पा म्हणून समतलीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असून, या प्रक्रियेंतर्गत ४० टक्क्यांहून अधिक काम आटोपत आले आहे. हे काम करीत असताना रस्ता मजबूत व्हावा म्हणून गौण खनिज असलेल्या मुरूमाचा वापर करणे आवश्यक आहे. या गौण खनिजाची मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडण्याबाबत कंत्राटदार कंपन्यांना निर्देशही देण्यात आले आहेत. तथापि, जिल्ह्यातील मानोरा-मंगरुळपीर आणि वाशिम-मंगरुळपीर दरम्यान होत असलेल्या कामांत नियमांचे उल्लंघन होत आहे. कंत्राटदार कंपन्या मुरुमाऐवजी थेट मातीचा वापर समतलीकरणासाठी करीत आहेत. यामुळे मार्गाचा दर्जा खालावणार आहे. त्यातही ही माती रस्त्यालगतच खोदकाम करून वापरण्यात येत असल्याचे दिसत आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या अधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.