१२ वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 15:29 IST2019-12-27T15:29:43+5:302019-12-27T15:29:45+5:30

सज्जू चौधरी व त्याच्या साथीदाराने बारा वर्षीय बालकाला मोटरसायकलवर बसवून शहराबाहेरील भेरा रस्त्यावरील विहिरीजवळ नेले.

Unnatural act with a 12-year-old boy | १२ वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य

१२ वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य


मालेगाव (वाशिम) - मालेगाव शहरातील १२ वर्षीय बालकाशी सज्जू चौधरी व त्याच्या साथीदाराने अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजतादरम्यान भेरा रस्त्यावरील विहिरीजवळ घडली. पिडीत बालकाच्या तक्रारीवरून दोन जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
शहरातील गांधीनगर भागात राहणारा आरोपी सज्जू चौधरी व त्याच्या साथीदाराने बारा वर्षीय बालकाला मोटरसायकलवर बसवून शहराबाहेरील भेरा रस्त्यावरील विहिरीजवळ नेले. तेथे त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. यावेळी त्या ठिकाणी शेतातील एका वयोवृद्ध महिलेने पाहिल्याने आरडाओरड केली. यामुळे आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घरी आल्यानंतर पिडीत बालकाने घडलेली घटना आई-वडलांना सांगितले. पिडीत बालकाच्या वडीलाने दिलेल्या फिर्यादीवरून सज्जू चौधरी व त्याच्या साथीदाराविरुद्ध भादंवी कलम ३७७, ३६३ ३४ नुसार पास्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.

Web Title: Unnatural act with a 12-year-old boy