कारंजा-शेलू रस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक; युवक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 17:32 IST2019-04-06T17:31:35+5:302019-04-06T17:32:01+5:30

वाशिम : कारंजावरून मालेगावकडे जाणाºया ट्रकने विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी वाहनास जोरदार धडक दिल्याने एक युवक जागीच ठार झाला.

Two-wheeler trucks accident; Youth killed on the spot | कारंजा-शेलू रस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक; युवक जागीच ठार

कारंजा-शेलू रस्त्यावर ट्रकची दुचाकीला धडक; युवक जागीच ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कारंजावरून मालेगावकडे जाणाºया ट्रकने विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी वाहनास जोरदार धडक दिल्याने एक युवक जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास कारंजापासून चार किलोमिटर अंतरावर असलेल्या कारंजा-शेलू रस्त्यावर घडली.
याबाबत सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, वाशिम येथील नालंदा नगरमध्ये सासूरवाडी असलेला तथा शेंदुरजना मोरे येथील रहिवासी धनराज खंडारे हा आपल्या दुचाकीने (एम.एच. ३० एन १८५४) मालेगावकडून कारंजाकडे जात होता. याचदरम्यान विरूद्ध दिशेने येणाºया एन.एल. ०१ ए.बी. २६२७ या क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीस जबर धडक दिली. यात धनराज खंडारे याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची वार्ता कळताच ‘सास’प्रमुख श्याम सवाई यांनी समृद्धी रुग्णवाहिका घेवून अजय घोडेस्वार यांना घटनास्थळी रवाना केले. यासंदर्भात पोलिसांनाही माहिती देण्यात आली असून वृत्त लिहिस्तोवर घटनेची नोंद पोलिसांत झालेली नव्हती.

Web Title: Two-wheeler trucks accident; Youth killed on the spot