खेर्डा-मुर्तीजापूर मार्गावर दुचाकी अपघातात आई व मुलगा जखमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 18:45 IST2018-03-05T18:45:07+5:302018-03-05T18:45:07+5:30

कारंजा लाड (वाशिम) : समोरून भरधाव वेगात येणाºया प्रवासी आॅटोने कावा मारल्यामुळे दुचाकीवरून पडून आई व मुलगा जखमी झाल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारी कारंजा-मुर्तीजापूर मार्गावरील खेर्डा फाट्यापासून एक किलोमिटर अंतरावर घडली. 

two-wheeler accident; two injured! | खेर्डा-मुर्तीजापूर मार्गावर दुचाकी अपघातात आई व मुलगा जखमी!

खेर्डा-मुर्तीजापूर मार्गावर दुचाकी अपघातात आई व मुलगा जखमी!

ठळक मुद्देकारंजा येथील शकुंतला महादेव महल्ले (वय ६८ वर्षे) आणि त्यांचा मुलगा गजानन हे दोघे दुचाकीने हिरपूर येथे जात होते. प्रवासी आॅटोने गजाननच्या दुचाकीला कावा मारल्याने दुचाकीसोबतच त्यावरील दोघेजण खाली पडले.

कारंजा लाड (वाशिम) : समोरून भरधाव वेगात येणाºया प्रवासी आॅटोने कावा मारल्यामुळे दुचाकीवरून पडून आई व मुलगा जखमी झाल्याची घटना ५ मार्च रोजी दुपारी कारंजा-मुर्तीजापूर मार्गावरील खेर्डा फाट्यापासून एक किलोमिटर अंतरावर घडली. 
याबाबत प्राप्त माहितीनुसार, कारंजा येथील शकुंतला महादेव महल्ले (वय ६८ वर्षे) आणि त्यांचा मुलगा गजानन हे दोघे दुचाकीने हिरपूर येथे जात होते. दरम्यान, कारंजा-मुर्तीजापूर मार्गावर समोरून येणाºया प्रवासी आॅटोने गजाननच्या दुचाकीला कावा मारल्याने दुचाकीसोबतच त्यावरील दोघेजण खाली पडले. यात दोघांच्याही डोक्याला, हाताला व पायाला जबर दुखापत झाली. कारंजा येथील ग्रामीण रूग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांची अकोला येथील रुग्णालयात रवानगी करण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर या घटनेची पोलिसांत नोंद झालेली नव्हती. 

Web Title: two-wheeler accident; two injured!