शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
2
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
3
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
4
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
5
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
6
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
7
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
8
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
9
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
10
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
11
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
12
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
13
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
14
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
17
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
18
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
19
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

दोन ऑटोरिक्षांच्या धडकेत एक ठार

By admin | Updated: October 19, 2014 00:28 IST

दोघे गंभीर जखमी, पोहरादेवी ते वाईगौळ रस्त्यावरील घटना.

मानोरा (वाशिम): अवैध वाहतूक करणार्‍या दोन ऑटोरिक्षांची धडक होऊन घडलेल्या अपघातात एक ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना पोलिस स्टेशन मानोरा अंतर्गत येणार्‍या पोहरादेवी ते वाईगौळ रस्त्यावर १७ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. विष्णू अशोक भालेराव ( ४२), असे मृतकाचे नाव असून, तो पोहरादेवी येथील रहिवासी होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये कमलाबाई किसन राऊत (६५) आणि मालू अरुण राऊत (४२), यांचा समावेश आहे. पोहरादेवी येथील विष्णू अशोक भालेराव, कमला किसन राऊत, मालू अरूण राऊत हे १७ ऑक्टोबरला सायंकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान एमएच २९ डब्ल्यू-९२८७ क्रमांकाच्या ऑटोरिक्षामध्ये बसून दिग्रसहून पोहरादेवीकडे येत असताना विरुद्ध दिशेने येत असलेला एमएच ३७ बी-६३११ क्रमांकाच्या ऑटोरिक्षाची आणि त्यांच्या ऑटोरिक्षाची जोरदार धडक झाली. या अपघातात कमलाबाई किसन राऊत यांच्या पायाला, मालू अरूण राऊत हिचे पाय, डोळे व हाताला गंभीर दुखापत झाली, तर विष्णू अशोक भालेराव याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या तिघांवरही सुरुवातीला दिग्रस येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना तातडीने यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले; परंतु गंभीर जखमी झालेल्या विष्णू अशोक भालेराव यांचा वाटेतच मृत्यू झाला. कमला किसन राऊत यासुद्धा गंभीर जखमी असून, त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत.