रिसोड -मेहकर मार्गावरील अपघातात दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 11:31 IST2020-06-27T11:30:20+5:302020-06-27T11:31:03+5:30

आसीफ खॉन फेरोज खान जागीच ठार झाला तर प्रताप नारायण बोडखे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

Two killed in road mishap | रिसोड -मेहकर मार्गावरील अपघातात दोन ठार

रिसोड -मेहकर मार्गावरील अपघातात दोन ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : रिसोड -मेहकर मार्गावरील मोठेगाव नजिक झालेल्या दोन मोटारसायकल अपघातात २ जण ठार तर ३ जण जखमी झाल्याची घटना २६ जून रोजी दुपारी ४ वा. दरम्यान घडली
रिसोड येथील अमरदास नगर निवासी आसिफ खान फेरोज खान,अरबाज खान इनायत खान,सुमेर खान मन्सूर खान हे दुचाकी एम एच ३७ एन. ८६३४ ने रिसोड कडे येत असतांना समोरु येणाऱ्या प्रताप नारायण बोडके यांच्या एम. एच. ३७ एक्स १६६२ मोटारसायकलला धडक झाली. यामध्ये आसीफ खॉन फेरोज खान जागीच ठार झाला तर प्रताप नारायण बोडखे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
बोडखे यांच्यासोबत असलेल्या साथीदारासह अरबाज खान इनायत खान,सुमेर खान मन्सूर खान हे तिघे जखमी झालेत. अपघातातील जखमींना वाशिम व मेहकर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.

Web Title: Two killed in road mishap