अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, वाहनचालक फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 15:04 IST2023-05-20T15:04:04+5:302023-05-20T15:04:13+5:30
याबाबत कपील रामभाऊ राठोड (वय २६) रा. गिर्डा यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, वाहनचालक फरार
मंगरुळपीर - तालुक्यातील मानोरा रस्त्यावर कोळंबी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवर असलेल्या दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना १९ मे रोजी रात्री घडली. याबाबत कपील रामभाऊ राठोड (वय २६) रा. गिर्डा यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार १९ मे चे रात्री घटनेतील दोन्ही मृत्तक नामे अनिकेत अरुण राठोड (वय २४) वर्ष रा. गिरडा व नागभुषन चंद्रमणी मनवर (वय ३२) रा. वार्डा ता. मानोरा हे दोघेही मोटार सायकल क्र. एम एच ३७ यु ९२३७ ने मंगरुळपीर येथे येताना रात्री ९ वाजताचे सुमारास कोळंबी फाट्याजवळ समोरुन येणा-या अज्ञात वाहन चालकाने जबर धडक दिली. यात दोघांचाही मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला. अनिकेत व नागभुषन यांचे मरणास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहन चालकावर कलम ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे.