शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटी निवडणुकीवरून दोन गटात हाणामारी

By admin | Updated: February 6, 2015 01:59 IST

मेडशी येथील घटना, ४९ जणांवर गुन्हे दाखल.

मालेगाव : मेडशी येथे सेवा सहकारी सोसायटीच्या सदस्यामधून अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतदान प्रतिनिधीची नियुक्ती करण्यासंदर्भात दोन गटामध्ये वाद होऊन लाठय़ा- काठय़ा व तलवारीने प्रचंड हाणामारी झाली. त्यामध्ये दोन्ही गटातील एकूण पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्या प्रकरणी एकूण ४९ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याची घटना ५ फेब्रुवारी रोजी येथील पोलीस चौकीसमोर घडली.मेडशी येथील शेख गणी शेख चाँद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ५ फेब्रुवारी २0१५ रोजी मेडशी येथील सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यालयामध्ये सकाळी १0.३0 वाजता एक सभा घेण्यात आली. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होऊ घातली असून, त्या निवडणुकीमध्ये सेवा सहकारी सोसायटी मेडशीमधून मतदान प्रतिनिधी पाठविण्याचा विषय या सभेमध्ये चर्चेसाठी आला होता. सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शिवराम शेंडे व उपाध्यक्ष शेख शब्बीर शेख अमिर, सचिव इंगोले व इतर सदस्य हजर होते. त्यामध्ये शेख गणी शेख चांद यांच्या नावाची मतदान प्रतिनिधी म्हणून निवडण्याचा विषय सभेपुढे आला असता त्याला मो. शब्बीर शेख अमीर यांनी विरोध करून त्यांना मारहाण केली. त्यामुळे ते गावातील पोलीस चौकीकडे पळाले असता. आरोपींनी त्यांच्या मुलगा शेख जमीर यास तोंडावर, डोक्यावर लाठय़ा -काठय़ाने मारहाण केली. तसेच मो. मजहर मो. शब्बीर यांनी तलवार मारून गंभीर जखमी केले. यावेळी इतर २२ जणांनी लाठय़ा-काठय़ाने व मुलाला लोखंडी पाईप, तलवारीने मारहाण केली. या प्रकरणी एकूण २३ जणांविरुद्ध कलम १४३, १४७, १४९, ३0७, ३२४, ५0४, ३२३, ५0६, ४२७, व ४, २५ आर्म अँक्टनुसार गुन्हे दाखल केले आहेत.