पाय घसरून दोन मुलींचा धरणात बुडून मृत्यू, वाशिम जिल्ह्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 02:09 IST2022-05-30T02:06:59+5:302022-05-30T02:09:23+5:30
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...

पाय घसरून दोन मुलींचा धरणात बुडून मृत्यू, वाशिम जिल्ह्यातील घटना
वाशिम - कारंजा दहिपुरा येथील रहिवासी असलेल्या दोन १८ वर्षीय मुलींचा अडाण धरणात पाय घसरून करूण मृत्यू झाल्याची घटना २९ मे रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
कारंजा ग्रामीण पोलीस स्थानकाने दिलेल्या माहिती नुसार, कारंजा येथील शाफीआ नासीर अली व उजमा अनिस अन्सारी या दोघी पिकनिकसाठी कारंजापासून १० किलोमीटर अंतरावर प्रिपी फॉरेस्ट गावानजीक अडान धरणावर गेल्या होत्या. दरम्यान, दोघींचाही पाय घसरून त्या धरणात पडल्या. पोहणे येत नसल्याने धरणात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना प्रिपी फॉरेस्ट गाववासीयाच्या लक्षात आली. यानंतर त्यांनी ग्रामीण पोलीस ठाण्याला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी दोघींनाही मृत घोषित केले. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.