शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींचे सौरऊर्जा संयंत्र कार्यान्वित झालेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:30 IST

जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातून गंभीर व अतिगंभीर रुग्ण उपचारासाठी दाखल होेतात. त्यांच्यावर उपचार सुरू ...

जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातून गंभीर व अतिगंभीर रुग्ण उपचारासाठी दाखल होेतात. त्यांच्यावर उपचार सुरू असताना वीजपुरवठा खंडित झाल्यास उपचाराकरिता असलेले विविध यंत्रदेखिल बंद पडतात. परिणामी, रुग्णांच्या उपचारात अडथळा निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन ३१ जुलै २०१९ रोजी २ कोटी १२ लाख रुपये खर्चून जिल्हा सामान्य रुग्णालयात सौर ऊर्जा संयंत्र प्रकल्पाची उभारणी करण्यात आली; परंतु हे संयंत्र दीड वर्षे उलटूनही अद्याप हा प्रकल्प आणि संयंत्र कार्यान्वित करण्यात आले नाही. यामुळे मूळ उद्देशाला हरताळ फासल्या गेला असून गंभीर आजारातील रुग्णांचा जीव धोक्यात सापडत आहे.सदर प्रकल्प सुरु करण्यामध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करुन हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

.....................

बॉक्स :

‘मनसे’ करणार आंदोलन

जिल्हा सामान्य रुग्णालयात गोरगरिब, गरजू रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. त्यांच्यासाठी लावण्यात आलेले यंत्र सदोदित सुरू राहावेत, यासाठी अखंडित वीज पुरवठा आवश्यक आहे आणि त्याकरिता दीड वर्षांपूर्वी सौरऊर्जा संयंत्र प्रकल्प मंजूर झाला. असे असताना प्रशासकीय उदासीनतेमुळे सदर प्रकल्प अद्याप कार्यान्वित झालेला नाही. हा प्रश्न तात्काळ निकाली काढा; अन्यथा डफडे बजाओ आंदोलन करू, असा इशारा ‘मनसे’चे प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे, तालुकाध्यक्ष मोहन कोल्हे, राजू किडसे, मो. नौरंगाबादी, बाळू विभुते, निखील बुरकुले यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खेडेकर यांच्याकडे निवेदनाव्दारे दिला.