बेंगलोरकडे संत्री घेवून जाणाऱ्या ट्रकचा अपघात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 15:53 IST2018-12-22T15:48:43+5:302018-12-22T15:53:24+5:30
मंगरूळपीर : मोर्शी (जि.अमरावती) येथून संत्री घेवून निघालेला ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गोलवाडी-मंगरूळपीर मार्गावर उलटला.

बेंगलोरकडे संत्री घेवून जाणाऱ्या ट्रकचा अपघात!
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : मोर्शी (जि.अमरावती) येथून संत्री घेवून निघालेला ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गोलवाडी-मंगरूळपीर मार्गावर उलटला. या अपघातात तीन लाखांचे नुकसान झाले. ही घटना २२ डिसेंबरच्या पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, अमरावती येथील संत्रा व्यापारी श्याम गणपत यांचा ट्रक (क्रमांक एम.एच. १३ ए.एक्स. २२९३) हा मोर्शी येथून संत्री घेवून बेंगलोरच्या बाजाराकडे चालला होता. पहाटे चार वाजताच्या सुमारास हा ट्रक चालकाचे वाहनावरील सुटल्याने गोलवाडी-मंगरूळपीर मार्गावर उलटला. त्यात असलेली पाच लाख रुपये किंमतीची संत्री यावेळी रस्त्यावर अस्ताव्यस्त पडली होती. त्यातील साधारणत: तीन लाखांच्या संत्र्याचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत ट्रकच्या चालक-वाहकास कुठलीही गंभीर दुखापत झालेली नाही.