शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

वाळू घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; एक ठार!

By admin | Updated: May 15, 2017 01:29 IST

केशवनगर गावानजिकची घटना : ट्रॅक्टर चालकास अटक

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : रिसोडहून वाळू घेऊन येणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने केशवनगर या गावानजिक दुचाकीस जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार ठार झाला; तर सातवर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.दापुरी येथील शालीकराम शेषराव जाधव (वय २५) हे त्यांच्या भावाचा मुलगा (पुतण्या) कर्तव्य शंकर जाधव (वय ७) यास घेऊन केशवनगर येथे जात होते. दरम्यान, रिसोडहून वाळू घेऊन येणाऱ्या ट्रॅक्टरने (क्रमांक एमएच ३७ २०७१) दुचाकीस (क्रमांक एमएच ३७ २५७९) जबर धडक दिली. यात शालिकराम जाधव हे गंभीर जखमी झाले; तर कर्तव्यचा पाय तुटून बाजूला पडला. उपचारासाठी नेत असताना शालिकराम जाधव यांचा मृत्यू झाला. कर्तव्य जाधव याच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, तो धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, संतप्त झालेल्या जमावाने अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रॅक्टरची तोडफोड केली. घटनेची माहिती कळताच शिरपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कमलेश खंडारे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश तोगरवाड, संजय रंजवे, मंगेश गोपनारायण यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. याप्रकरणी आरोपी मो. रफीक अ. गणी (रा. शिरपूर) यास पोलिसांनीे अटक केली. वाहनचालकांप्रती गावकऱ्यांनी व्यक्त केला रोषशालिकराम जाधव यांच्या दुचाकीला ट्रॅक्टरने दिलेली धडक एवढी जोरदार होती, की वाहन सुमारे २५ फूट घासत गेले. यादरम्यान गंभीर जखमी अवस्थेतील जाधव आणि त्यांच्या पुतण्याला मदतीची गरज असताना रस्त्यावरून धावणाऱ्या एकाही खासगी वाहनधारकाने माणुसकी दाखविली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी रोष व्यक्त करीत एकही वाहन बराच वेळ दापुरी येथून जाऊ दिले नाही.