रस्त्यात ट्रक फसल्याने वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:40 IST2021-09-13T04:40:49+5:302021-09-13T04:40:49+5:30

मानोरा : तालुक्यातील पंचाळा ते पोहरादेवी रस्त्यावर १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता सिमेंटच्या विटा घेऊन जाणारा ट्रक फसला. ...

Traffic jam due to truck crash on the road | रस्त्यात ट्रक फसल्याने वाहतूक ठप्प

रस्त्यात ट्रक फसल्याने वाहतूक ठप्प

मानोरा : तालुक्यातील पंचाळा ते पोहरादेवी रस्त्यावर १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता सिमेंटच्या विटा घेऊन जाणारा ट्रक फसला. यामुळे सुमारे दीड तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

प्राप्त माहितीनुसार, मानोरामार्गे पोहरादेवी येथे सिमेंटच्या विटा घेऊन नगारा वास्तूच्या बांधकामस्थळी जात असलेला एम.एच. ०४ सी.जी. ९३९४ या क्रमांकाचा ट्रक नादुरुस्त रस्त्याच्या एका कडेला फसला. यामुळे दोन्हीकडून धावणारी वाहने जागीच ठप्प झाली. या प्रकारामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली.

..............

नादुरुस्त रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर

मानोरा तालुक्यातील पंचाळा ते पोहरादेवी हा रस्ता गेल्या कित्येक महिन्यांपासून नादुरुस्त आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. रस्त्याची किमान डागडजी करून दैनंदिन विस्कळीत होत असलेली वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे; मात्र त्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असून नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.

...................

कोट :

पंचाळा ते पोहरादेवी या रस्त्याची दुरवस्था झाली असून मार्गावरील पूलही मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाला आहे. परिणामी, नागरिकांना दुचाकी, चारचाकी वाहने चालविताना त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

- संजय महाराज, पोहरादेवी

Web Title: Traffic jam due to truck crash on the road