अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 07:07 IST2026-04-14T07:05:37+5:302026-04-14T07:07:37+5:30

Kalyan Accident News: कल्याण - मुरबाड महामार्गावर उल्हास नदीवर नव्याने बांधलेल्या रायता पुलावर सोमवारी प्रवाशांची वाहतूक करणारी इको टॅक्सी आणि सीमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. त्यात टॅक्सीचालकासह सर्व ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

Illegal passenger transport takes lives, 11 people die, how exactly did the accident happen on the Kalyan-Murbad highway? | अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?

अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?

- राजेश जाधव
म्हारळ (कल्याण) - कल्याण - मुरबाड महामार्गावर उल्हास नदीवर नव्याने बांधलेल्या रायता पुलावर सोमवारी प्रवाशांची वाहतूक करणारी इको टॅक्सी आणि सीमेंट काँक्रीट मिक्सर ट्रकची टक्कर होऊन भीषण अपघात झाला. त्यात टॅक्सीचालकासह सर्व ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. 

अपघात एवढा भीषण होता की टॅक्सीचा पूर्ण चेंदामेंदा झाला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी यंत्रणेला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.  अपघातग्रस्त सहा आसनी टॅक्सीत ११ प्रवासी कोंबले होते. ते अवैध वाहतुकीचे बळी ठरले.

ग्रामस्थांनी तातडीने अपघातग्रस्तांना गोवेली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दोन्ही चालकांवर गुन्हा दाखल केला असून ट्रकचालक फरार झाल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक अनिल लाड यांनी ‘लोकमत’ला दिली. 

कसा घडला अपघात?
सोमवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान कल्याण येथून प्रवाशांना मुरबाडला घेऊन जाणारी इको टॅक्सी आणि मुरबाडमार्गे येणारा सीमेंट काँक्रीट मिक्सर हे रायता येथील उल्हास नदीवर नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलावर समोरासमोर आले. पुलावरील एका मार्गिकेचे काम सुरू असल्याने एकच मार्गिका सुरू आहे. त्या मार्गिकेवर वेगाने जाणारी टॅक्सी आणि ट्रकची टक्कर झाली.

दोन सख्ख्या बहिणी अन् भावाचा अंत
अपघातात दिवा (ठाणे) येथील मोहपे कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणी व भावाचा मृत्यू झाला. ते त्यांच्या काकाच्या मुलाच्या हळदी समारंभासाठी पर्हे गावात जात होते. त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला असून आईला कोणाचा आधार राहिला नाही.

मृतांची नावे    
टॅक्सी चालक प्रशांत ऊर्फ बबलू  चंदने (२१, देवगाव, मुरबाड), भूषण घोरपडे (४४, अंधेरी),  जिजा केंबारी (५०, टेंभरे, मुरबाड), अनंता पवार (साखरे, मुरबाड), दीपक गवळी (कल्याण), गणपत मधे (३२, देवराळवाडी, मुरबाड), नेहा मोहपे, (२२, दिवा), मानसी मोहपे (२०, दिवा), प्रथमेश मोहपे (१७, दिवा), रिंकू लोधी ( ४०, मध्य प्रदेश), गणेश गुरव (४०, कुर्ला).

Web Title : अवैध यात्री परिवहन घातक: कल्याण-मुरबाड दुर्घटना में 11 की मौत

Web Summary : कल्याण-मुरबाड राजमार्ग पर एक इको टैक्सी और सीमेंट मिक्सर ट्रक की भीषण टक्कर में तीन महिलाओं सहित 11 लोगों की तत्काल मौत हो गई। यात्रियों से भरी टैक्सी अवैध रूप से यात्रा कर रही थी। ट्रक चालक मौके से फरार हो गया; पुलिस जांच कर रही है।

Web Title : Illegal Passenger Transport Turns Deadly: 11 Killed in Kalyan-Murbad Accident

Web Summary : A horrific collision between an Eco taxi and a cement mixer truck on the Kalyan-Murbad highway resulted in the immediate deaths of 11 people, including three women. The taxi, overloaded with passengers, was traveling illegally. The truck driver fled the scene; police are investigating.