ट्रॅक्टर, ट्राली चोरणारे तीन चोरटे जेरबंद! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 18:40 IST2018-12-19T18:39:58+5:302018-12-19T18:40:12+5:30

पोलिसांनी डोणगाव (जि.बुलडाणा) येथून एकास; तर परभणी जिल्ह्यातून दोघांना १८ डिसेंबर रोजी अटक केली. यासह चोरीला गेलेला ट्रॅक्टर, ट्राली व अन्य साहित्य जप्त केले. 

Tractor, Trolley thieves robbed of three thieves! | ट्रॅक्टर, ट्राली चोरणारे तीन चोरटे जेरबंद! 

ट्रॅक्टर, ट्राली चोरणारे तीन चोरटे जेरबंद! 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मालेगाव तालुक्यातील नागरतास येथील रामा ठोंबे यांचे एम. एच. ३७ ए ५०७९ या क्रमांकाचे ट्रॅक्टर आणि एम. एच. ३७ ए ७५५५ या क्रमांकाची ट्राली चोरीला गेल्याची तक्रार ५ नोव्हेंबर २०१८ रोजी मालेगाव पोलिसांत दाखल झाली. याप्रकरणी पोलिसांनी डोणगाव (जि.बुलडाणा) येथून एकास; तर परभणी जिल्ह्यातून दोघांना १८ डिसेंबर रोजी अटक केली. यासह चोरीला गेलेला ट्रॅक्टर, ट्राली व अन्य साहित्य जप्त केले. 
प्राप्त माहितीनुसार, चोरीच्या प्रकरणाचा तपास करित असताना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अतुल मोहनकर, पोलिस उपनिरीक्षक दिनकर गोरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक भगवान गावंडे यांच्यासह पथकातील अन्य कर्मचाºयांनी डोणगाव (जि. बुलडाणा) येथून गजानन लक्ष्मण मुळे यास शिताफिने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने साथीदारांचीही नावे सांगितली. त्याआधारे पोलिसांनी हिंगोली व परभणी जिल्ह्यातून मधुकर पांडुरंग घुगे (सावडी, ता. जिंतूर, जि. परभणी) आणि रामेश्वर गलसिंग जाधव (अंबरवाडी, ता. जिंतूर) या दोघांना ताब्यात घेतले. तसेच हिंगोली व परभणी जिल्ह्यातून ट्रॅक्टर, ट्रालीसह चोरीला गेलेले अन्य साहित्य जप्त केले. नमूद आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी मालेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

Web Title: Tractor, Trolley thieves robbed of three thieves!