१५ दिवसांत तिसऱ्यांदा उलटला टोमॅटोचा ट्रक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:46 IST2021-09-05T04:46:50+5:302021-09-05T04:46:50+5:30

चालक तथा मालक पंढरीनाथ ऑयलाजी कोल्हे (५०) व त्यांचा मुलगा बळीराम पंढरीनाथ कोल्हे (२०) हे दोघे बापलेक आपल्या एम.एच. ...

Tomato truck overturns for third time in 15 days | १५ दिवसांत तिसऱ्यांदा उलटला टोमॅटोचा ट्रक!

१५ दिवसांत तिसऱ्यांदा उलटला टोमॅटोचा ट्रक!

चालक तथा मालक पंढरीनाथ ऑयलाजी कोल्हे (५०) व त्यांचा मुलगा बळीराम पंढरीनाथ कोल्हे (२०) हे दोघे बापलेक आपल्या एम.एच. २६ एडी १७२५ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये शिन्नर येथून ओडिसाकरिता टोमॅटो घेऊन जात होते. यावेळी नागपूर ते औरंगाबाद या महामार्गावरील मालेगाव-शेलुबाजार दरम्यान हाॅटेल किन्हीजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना, चालक पंढरीनाथ कोल्हे यांचे आपल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक महामार्गावर उलटला. या अपघातात चालक पंढरीनाथ कोल्हे हे गंभीर जखमी झाले असून क्लीनर बळीराम कोल्हे हा किरकोळ जखमी झाला. घटनेचे वृत्त कळताच किन्हीराजा पोलीस चौकीचे पोलीस कर्मचारी नीलेश घुगे व महिंद्र दाभाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहीती घेतली आहे. गेल्या पंधरा दिवसांत याच भागात टोमॅटोची तीन वाहने उलटल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Tomato truck overturns for third time in 15 days