ट्रकच्या धडकेने टिनशेड तुटले; ४० हजाराचे नुकसान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 18:24 IST2018-09-18T18:23:54+5:302018-09-18T18:24:31+5:30
कारंजा लाड : कारंजा ते मंगरूळपीर मार्गावरील कारंजा बायपास परिसरातील एका आॅटोझोनमध्ये मालवाहू ट्रक घुसल्याने टिनशेड तुटले

ट्रकच्या धडकेने टिनशेड तुटले; ४० हजाराचे नुकसान !
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड : कारंजा ते मंगरूळपीर मार्गावरील कारंजा बायपास परिसरातील एका आॅटोझोनमध्ये मालवाहू ट्रक घुसल्याने टिनशेड तुटले. ही घटना १८ सप्टेंबरला सकाळच्या सुमारास घडली.
एम. एच.२३ डब्ल्यु ११९७ क्रमांकाचा मालवाहू ट्रक रस्त्यावर उभा करून चालक हा चहा पिण्यासाठी बाजूला गेला. सदर मालवाहू ट्रक आपोआप ‘न्युट्रल’ झाल्याने रस्त्यालगत असलेल्या एका आॅटोझोनमध्ये घुसला. यामुळे आॅटोझोनसमोरील टीनपत्र्याचे शेड तुटून खाली पडले. तसेच आॅटोझोनच्या काचाची देखील किरकोळ त्नुकसान झाले. शोरूम मालक मंगेश कडेल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे अंदाजे ४० हजार रूपयांचे नुकसान झाले.