तिसरे आदिवासी विचार जागर अभियान रविवारी वाशिममध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 07:58 PM2017-12-25T19:58:29+5:302017-12-25T20:12:44+5:30

वाशिम : शिकारीतून शिक्षणाकडे, व्यसनातून विचाराकडे, या विचारधारेला अनुसरुन  मराठवाडा, खान्देश विदर्भात आदिवासी पारधी, फासेपारधी विचार जागराचे क्रमिक बारमाही आयोजन करण्यात येते. यानुसार तिसरे विचार जागर अभियान वाशिम येथे ३१ डिसेंबर रोजी आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शोभा भोसले यांनी दिली.

Third Tribal Idea Jagar campaign on Sunday in Washim! | तिसरे आदिवासी विचार जागर अभियान रविवारी वाशिममध्ये!

तिसरे आदिवासी विचार जागर अभियान रविवारी वाशिममध्ये!

googlenewsNext
ठळक मुद्देमान्यवरांची राहणार उपस्थितीनवनिर्वाचित सरंपचांचा होणार सत्कार 

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : शिकारीतून शिक्षणाकडे, व्यसनातून विचाराकडे, या विचारधारेला अनुसरुन  मराठवाडा, खान्देश विदर्भात आदिवासी पारधी, फासेपारधी विचार जागराचे क्रमिक बारमाही आयोजन करण्यात येते. यानुसार तिसरे विचार जागर अभियान वाशिम येथे ३१ डिसेंबर रोजी आयोजित केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शोभा भोसले यांनी दिली.

आदिवासी पारधी समाजामध्ये असलेल्या अनिष्ठ चालिरीती शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा, व्यसनाधिनता, बालविवाह आदि घातक प्रथांना आळा घालण्यासाठी या विचार जागर अभियानातून वैचारिक प्रबोधन मान्यवरांकडून केले जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रकल्प पर्यटन शासकीय लालफितीत अडकलेल्या योजना व आदिवासींचे प्रश्न यावर प्रकल्प अधिकाºयांकडून विविध योजनांची माहिती समाजबांधवांना दिली जाणार आहे. या तिसºया आदिवासी पारधी, फासे पारधी विचार जागर अभियान कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णराव चव्हाण, संस्थापक अध्यक्ष आदिवासी विकास परिषद महाराष्टÑ राज्य व आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त हे राहतील उद्घाटक म्हणून मंगरुळपीर, वाशिमचे आमदार लखन मलिक राहणार आहेत. स्वागताध्यक्ष म्हणून जि.प. अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख, या राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सुभाष शिंदे, यवतमाळचे तहसिलदार परसराम भोसले, आदि मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. ‘दैना’ कादंबरीकार नामदेवराव भोसले  हे विचार जागर अभियानाचे मुख्य वक्ते आहेत. या कार्यक्रमात वाशिम जिल्ह्यातील नवोदीत सरपंचांचा सत्कारही करण्यात येणार आहे. यामध्ये देवराव सखाराम पवार मातणी, समाजमान्य नाईक, सुमन राजू पवार पेडगाव ता.रिसोड, शालीक विठ्ठल पवार शेलगाव ता. मालेगाव, वंदना दिगांबर चव्हाण जाखरूण पटाळे, सुनिता नंदू चव्हाण बाभुळगाव, सुनिता भोसले सुकळी, बेबीताई कैलास पवार बीबखेडा, सागर महादेव पवार, भानुदास पवार डवा, रमेश  चव्हाण पांझरेखडा जगदीश पवार सावरगाव बर्डी, सुचित्रा पवार इंझा यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला आदिवासी पारधी विकास परिषदेचे यवतमाळ, अकोला व बुलडाणा येथील शशिकला झाडे, श्रीकृष्ण राठोड,  विनोदराव डाबेराव, संगीता सांळुखे, पपीता माळवे, बाबुराव राठोड, अमरसिंग भोसले, सुखदेवराव सोळंके यांची उपस्थिती राहील. या कार्यक्रमाला वाशिम जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष देवराव पवार, महिला जिल्हा अध्यक्ष शोभा भोसले व जिल्हा संगठण संगीता चव्हाण यांनी केले आहे.

Web Title: Third Tribal Idea Jagar campaign on Sunday in Washim!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम