चोरट्यांनी मंत्र्यांच्या ‘पीए’चे पॉकिट पळविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 20:10 IST2022-05-29T20:10:39+5:302022-05-29T20:10:47+5:30

Crime News : युसूफ पुंजाणी यांच्या खिश्यातील पॉकिटावर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना २९ मे रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

Thieves snatch ministers' PA pockets! | चोरट्यांनी मंत्र्यांच्या ‘पीए’चे पॉकिट पळविले!

चोरट्यांनी मंत्र्यांच्या ‘पीए’चे पॉकिट पळविले!

कारंजा लाड : कारंजा शहरातील एका पतसंस्थेच्या स्थानांतरण व लोकार्पण सोहळ्यात राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चु कडू यांचे स्वीय सहायक (पीए) आणि राकॉंचे ज्येष्ठ नेते युसूफ पुंजाणी यांच्या खिश्यातील पॉकिटावर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना २९ मे रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.
एका पतसंस्थेच्या स्थानांतरण व लोकार्पण सोहळ्याला ना. बच्चू कडू, युसूफ पुंजाणी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान एका पॉकेटमाराने राज्यमंत्री कडु यांचे स्वीयसहायक व युसुफ पुजांणी यांच्या खिश्यातील पॉकिटावर डल्ला मारून रोख रक्कम लपांस केली. हा प्रकार माजी नगरसेक सयद मुजाहीद यांच्या लक्षात येताच त्यांनी पुजांणी यांना घडलेल्या प्रकारची कल्पना दिली. काही जण्ाांनी पॉकेटमार हे बसस्थानकाकडे गेल्याची माहिती दिली. पाठलाग करून पॉकिटमाराला कारंजा शहर पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. पोलिसांनी या पॉकिटमाराविरूध्द काय कारवार्इ्र केली याचा तपसील वृत्त लिहिस्तोवर मिळाला नाहि. राज्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाचा आणि राष्ट्रवादीच्या नेत्याचा खिश्यातील पॉकिट भरगच्च कार्यक्रमातून लंपास केल्या जाते, तर मग सर्वसामान्यांचे काय? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला.
 
पॉकिटात होते १५ हजार रुपये
यावेळी पॉकिटमाराने युसुफ पुंजाणी यांच्या खिश्यातुन नगदी १५ हजार रुपये व राज्यमंत्री बच्चु कडु यांच्या स्वीय सहायकाच्या खिश्यातील पर्स पळविली होती. या पर्समध्ये नगदी रक्कमेसह काही महत्वाची कागदपत्रे असल्याचेही सुत्रांकडुन सांगण्यात आले.

Web Title: Thieves snatch ministers' PA pockets!