नियंत्रण सुटल्याने रस्त्याखाली पलटली कार, युवक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 23:41 IST2022-08-29T23:38:03+5:302022-08-29T23:41:21+5:30
सतीश कैलास दुधाट, असे मृतकाचे नाव असून, तो अनसिंग येथील रहिवासी आहे.

नियंत्रण सुटल्याने रस्त्याखाली पलटली कार, युवक ठार
वाशिम: धावत्या कारवरील नियंत्रण सुटल्याने कार १० फूट रस्त्याच्या खाली उलटल्याने ३० वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि.२८ ऑगस्ट) रात्री ११ वाजताच्या सुमारास अनसिंगनजिक घडली. सतीश कैलास दुधाट, असे मृतकाचे नाव असून, तो अनसिंग येथील रहिवासी आहे.
सतीश कैलास दुधाट हा युवक रविवारी रात्री एमएच १२, आरवाय ६९५६ क्रमांकाच्या कारने वाशिम येथून अनसिंगकडे येत होता. वाशिम ते पुसद मार्गावर काकडदातीनजिकच्या महादेव मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या वळणावर अचानक कार रस्त्याच्या खाली उतरून उलटली. यात कैलास दुधाटचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला. कैलास दुधाटला एक मुलगा असून, तो घरातील एकमेव कर्ता पुरुष होता. त्यामुळे त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे.