यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा संघ राज्यस्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 02:00 PM2018-11-21T14:00:50+5:302018-11-21T14:02:47+5:30
मंगरुळपीर : जिल्हा क्रीडा संकलु अकोला येथे झालेल्या विभागीयस्तरिय शालेय थ्रो-बॉल स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण विद्यालयाचा १७ वर्ष वयोगटातील मुलींचा संघ विजयी होवून संघाची जिल्हा क्रीडा संकुल परभणी येथे होणाºया शालेय राज्यस्तरिय स्पर्धेकरीता निवड झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

स्पर्धेमध्ये अंतीम सामन्यांमध्ये अमरावती जिल्हा संघाला पराजित करुन मुलींनी विजेतेपद पटकाविले. विजयी संघाचे मोतीराम ठाकरे शिक्षण मंडळ कासोळाचे अध्यक्ष तथा माजी क्रीडा राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे , संस्था सचिव चंद्रकांत ठाकरे यांनी कौतूक केले. विजयी संघामध्ये स्रेहल आडे, सुहानी मानेकर, धनश्री भोयर, कस्तुरी देशमुख, रश्मी रोकडे, आदिती राऊत, फाल्गुनी नाकाडे, राधिका पवार, महिला जयस्वाल, अश्विनी गजभार, साक्षी ठाकरे, नूतन डाखोरे इत्यादी खेळाडू विद्यार्थीनींचा सहभाग होता. विजयी संघाला विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद सुडके व क्रीडा मार्गदर्शक गजानन विटकरे यांचे मार्गदर्शन लाभले. या संघाला दिपक चव्हाण, शिवानंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षीत करण्यात आले होते. विजयीखेळाडूंचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये, किशोर बोंडे, संजय पांडे, चंद्रकांत उप्पलवार, मिलींद काटोलकर, जानकी कुळकर्णी , संतोष कनकारवर, सुरज भड, कलिम मिर्झा, भारत वैद्य यांची यउपस्थिती लाभली होती.