शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
3
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
4
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
5
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
6
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
7
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
8
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
9
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
10
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
11
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
12
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
13
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
14
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
15
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
16
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
17
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
18
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
19
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
20
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट

तलाठ्यांचा कारभार चालतोय भाड्याच्या खोलीतून !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 6:05 PM

मालेगाव (वाशिम): महसूल विभागाचा कणा म्हणून परिचित असलेल्या बहुतांश तलाठ्यांना स्वतंत्र जागा व इमारत नसल्याने भाड्याच्या खोलीतून कारभार हाकण्याची वेळ आली आहे.

मालेगाव (वाशिम): महसूल विभागाचा कणा म्हणून परिचित असलेल्या बहुतांश तलाठ्यांना स्वतंत्र जागा व इमारत नसल्याने भाड्याच्या खोलीतून कारभार हाकण्याची वेळ आली आहे. मालेगाव तालुक्यातील तलाठ्यांना गत पाच वर्षांपासून खोलीच्या भाड्यापोटी रक्कमही मिळाली नाही. संपूर्ण जिल्ह्यात तलाठी कार्यालयासाठी केवळ ९ शासकीय इमारती असून, त्याचीही दुरुस्ती रखडली असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे.शासनाचा १४ फेब्रुवारी १९९२च्या शासन निर्णयाने तलाठ्यांना कार्यालय नसल्यास, खासगी जागा कार्यालयासाठी घेता येते. यासाठी १२५ रुपये भाड्यापोटी मिळत होते. बदलत्या काळानुसार, भाड्याच्या रकमेत वाढ करण्यात आली. ५ जून २०१३ च्या शासन निर्णयानुसार शासनाने ग्रामीण भागाकरिता एक हजार रुपये आणि शहरी भागाकरिता दोन हजार रुपये मंजूर केलेले आहेत. गत पाच वर्षांपासून तलाठ्यांना भाड्यापोटी एक रुपयादेखील मिळाला नाही. तलाठी हा ग्रामीण भागातील महसूलचा महत्त्वाचा दुवा आहे. जमीन महसूल वसूल करणे, अकृषक कर वसूल करणे, अवैध गौण खनिज वाहतूकप्रकरणी दंड वसूल करणे यासह अन्य महत्त्वाची कामे तलाठ्यांवर सोपविण्यात आली आहेत. मात्र, काही ठिकाणचा अपवाद वगळता बहुतांश तलाठ्यांना स्वतंत्र जागा व कार्यालय नसल्याने कामकाज करताना तलाठ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.मालेगाव तालुक्यात एकूण ९  मंडळ अधिकारी असून त्यापैकी एक पद रिक्त आहे. १२२ गावे मिळून ४८ तलाठी असून ४९ साजे आहेत. मालेगाव मंडळात एकूण १४ गावे आहेत तर शिरपूरमध्ये ९, किन्हिराजामध्ये १४, मेडशीमध्ये १६, मुंगळा १५, जऊळका रेल्वे १६, करंजी २४ आणि चांडस मंडळात एकूण १२ गावे येतात. एकही स्वतंत्र मंडळ कार्यालय नाही. सध्या ४७ इमारती भाडेतत्त्वावर आवश्यक आहेत. शासनाने तलाठ्यांसाठी स्वतंत्र जागा व इमारत उपलब्ध करून द्यावी किंवा भाड्याची इमारत व भाड्याच्या रकमेची व्यवस्था करावी, अशी मागणी तलाठी, मंडळ अधिका-यांमधून होत आहे.

टॅग्स :washimवाशिम