शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल होऊ शकतो गुन्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:44 IST

अनेकवेळा विद्युत देयक थकबाकी किंवा अन्य कारणांसाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर शेजाऱ्यांकडून वीज पुरवठा जोडून घेतला जातो; ...

अनेकवेळा विद्युत देयक थकबाकी किंवा अन्य कारणांसाठी महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यानंतर शेजाऱ्यांकडून वीज पुरवठा जोडून घेतला जातो; मात्र नकळत घडणारा हा प्रकार अंगलट येऊ शकतो. शेजाऱ्याकडून वीज पुरवठा घेणाऱ्यांवर आणि तो देणाऱ्यांवरही कारवाई केली जाऊ शकते. घराला लागूनच दुकान आहे, तिथे स्वतंत्र मीटर न घेता घरातूनच वीज पुरवठा जोडलेला असेल, तरीदेखील कारवाईचे प्रावधान आहे, अशी माहिती महावितरणकडून प्राप्त झाली.

................

महावितरणकडून वर्षभरात झालेली कारवाई...

शहर - ५०/१४.४९ लाख/१.१५ कोटी

ग्रामीण - १७/३.५० लाख/३२.६७ लाख

एकूण - ७७/१७.९९ लाख/१.४८ कोटी

...............

कायदा काय सांगतो?

विद्युत कायदा २००३ मधील कलम १२६ नुसार शेजाऱ्यांकडून अनधिकृत पद्धतीने वीज पुरवठा घेणे, मंजूर वर्गवारीतून इतर वर्गवारीसाठी अनधिकृत वीज वापर केल्याप्रकरणी कारवाई केली जाऊ शकते. यासह मीटरशी छेडछाड, आकडा टाकून वीज वापर, सर्व्हिस वायर टॅप केल्यास कलम १३५ नुसार कारवाई केली जाते.

................

चोरी कळवा, दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस मिळवा

१) २००३ मध्ये तयार केलेल्या विद्युत कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. वाढत्या वीज चोरीला आळा घालण्याकरिता ‘वीजचोरी कळवा, बक्षीस मिळवा’, ही अभिनव योजनाही हाती घेण्यात आली आहे.

याअंतर्गत वीजचोरीची माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातात. एवढेच नव्हे, तर संबंधितास वीजचोराकडून वसूल करण्यात आलेल्या दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.

...............

कोट :

महावितरणकडून पुरविली जाणारी वीज चोरट्या मार्गाने वापरणाऱ्यांची कुठलीच गय केली जात नाही. त्यामुळे ग्राहकांनी जागरूक राहावे. शेजाऱ्यांकडून अनधिकृत पद्धतीने वीज वापरणाऱ्यांवर आणि घरातील वीज दुकानासाठी वापरणाऱ्यांवरही कारवाई करण्याची तरतूद कायद्यात करण्यात आलेली आहे.

- सतीश मोरे

अति. कार्यकारी अभियंता, भरारी पथक, वाशिम