शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तीला वर्ष उलटल्यानंतरही निवृत्ती वेतनासह उपदान प्रलंबित 

By admin | Updated: April 8, 2017 17:38 IST

सेवानिवृत्ती वेतन न मिळाल्याने कार्यालयाच्या चकरा मारुन पैसा व वेळ वाया

कामरगाव : पशूवैद्यकीय विभागात पट्टीबंधक पदावर ३० वर्षाहून अधिक सेवा दिल्यानंतर मागील वर्षी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला वर्ष उलटले तरी, निवृत्त वेतन मंजूर झाले नाही, तसेच इतर उपदानाचे लाभही त्यांना मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या परिवारावर उपासमारीची पाळी आली आहे. कामरगाव येथील गोपाळराव किसनराव हिरुळकर हे कामरगावच्या पशूवैद्यकीय दवाखान्यात पट्टीबंधक या पदावर कार्यरत होते ते २९ फेबु्रवारी २०१६ रोजी सेवानिवृत्त झाले. नियमानुसार त्यांच्या निवृत्ती वेतन मंजुरीची प्रक्रिया तातडीने करून इतर उपदानाचे लाभही त्यांना मिळायला हवे होते; परंतु  गोपाळरावांना निवृत्त होऊन एक वर्ष पूर्ण झाले तरी त्यांचे मासीक सेवानिवृत्त वेतन मंजूर झालेले नाही. तसेच ग्रॅच्युईटीही देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची व कुटूंबाची उपासमार होत आहे. मासिक सेवानिवृत्त वेतन मंजूर न झाल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत असून याबाबत वारंवार तक्रारी व निवेदन देवूनही यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. उलट पंचायत समिती कारंजा येथील लिपीकास याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देतात. संपूर्ण आयुष्य मुके जनावरांची सेवा करण्यात घालविली असून एक वर्ष होवूनही सेवानिवृत्ती वेतन न मिळाल्याने कार्यालयाच्या चकरा मारुन पैसा व वेळ वाया जात असून लवकरात लवकर वेतन न मिळाल्यास कुटूंबासह आत्महत्या करावी लागेल अशी खंत गोपाळराव हिरुळकर यांनी केली आहे