नेटवर्कअभावी ऑनलाईन अभ्यासासाठी विद्यार्थ्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 12:23 IST2020-09-30T12:22:53+5:302020-09-30T12:23:45+5:30
नेटवर्कमध्ये अडथळे येत असल्यामुळे अभ्यास करावा तरी कसा असा प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थी करीत आहेत.

नेटवर्कअभावी ऑनलाईन अभ्यासासाठी विद्यार्थ्यांची धडपड
लोकमत न्यूज नेटवर्क
धनज बु. : कोरोना संसर्गामुळे राज्यभरातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणाचा आधार घेण्याच्या सुचना सर्व जिलह्यातील शाळांना दिल्या. त्याची अमलबजावणीही होत आहे; परंतु ग्रामीण भागात नेटवर्क प्रॉब्लेममुळे विद्यार्थी, घराच्या छतावर किंवा झाडावर चढून आपला अभ्यास करीत असल्याचे चित्र धनज बु. परिसरात पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात मोबाईलचे नेटवर्क अचानक जाणे, फोन सुरु असताना कट होणे, ३ जी , ४ जी सेवा वारंवार खंडित होणे. या सारख्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अडचणी येत असलयाने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. सर्व कंपनीच्या नेटवर्कमध्ये अडथळे येत असल्यामुळे अभ्यास करावा तरी कसा असा प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थी करीत आहेत.