चिमुकल्यांनी जाणून घेतले जलसंधारणाचे महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 16:30 IST2018-12-30T16:02:12+5:302018-12-30T16:30:04+5:30
मालेगाव तालुक्यातील कुरळा येथे होत असलेल्या नाला खोलीकरणाची पाहणी रविवारी शालेय विद्यार्थ्यांनी केली आणि बीजेएसच्या तालुका समन्वयकांकडून जलसंधारणाचे महत्त्वही जाणून घेतले.

चिमुकल्यांनी जाणून घेतले जलसंधारणाचे महत्त्व
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस)सामंजस्य करारातून जिल्हा दुष्काळमूक्त करण्यासाठी सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यातील कुरळा येथे होत असलेल्या नाला खोलीकरणाची पाहणी रविवारी शालेय विद्यार्थ्यांनी केली आणि बीजेएसच्या तालुका समन्वयकांकडून जलसंधारणाचे महत्त्वही जाणून घेतले.
सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यात कुराळा गावात नालाखोलीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. गावच्या सरपंचांनी या कामाचे उद्घाटन केले. या अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यात गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. या कामांसाठी गावकºयांचे सहकार्य लाभत आहे. रविवारी कुरळा येथे या अभियानांतर्गत सरंपचांच्या हस्ते नाला खोलीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील शालेय विद्यार्थ्यांनी कामाची पाहणी केली आणि बीजेएसचे तालुका समन्वयक वैभव किर्तणकार यांच्याकडून जलसंधारणाचे आणि पाण्याचे महत्त्व जाणून घेतले. सर्व बालकांनी ’जल है तो कल है’ हा नारा देत प्रत्येक बाबीचे बारकाईने आणि उत्सुकतेन ेनिरीक्षण केले. या प्रसंगी ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांचीही उपस्थिती होती.